विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतीय उद्योजकांना आणि स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. याअंतर्गत, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांनी अमृत महोत्सवा अंतर्गत ‘अॅप इनोव्हेशन चॅलेंज २०२१ ‘ सुरू केले आहे. या आव्हानातील विजेत्यांना २५ लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस मिळेल.
या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे. या चॅलेंजमध्ये (आव्हानात) प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना अनुक्रमे २५ लाख, १५ लाख आणि १० लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतील. प्रत्येक गटात १६ विजेत्यांची घोषणा केली जाईल. याचा अर्थ विजेत्यांना एकूण ८ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्जदारांना MyGov पोर्टल – www.mygov.in वर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
भारतीय उद्योजक आणि स्टार्ट-अप व्यतिरिक्त, हायस्कूल, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील या स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी आहे. अमृत महोत्सव अॅप इनोव्हेशन चॅलेंज २०२१ यात १६ श्रेणींमध्ये सुरू करण्यात आले आहे. यामध्ये संस्कृती आणि वारसा, आरोग्य, शिक्षण, सोशल मीडिया, उदयोन्मुख तंत्रज्ञान, कौशल्ये, बातम्या, खेळ, मनोरंजन, कार्यालय, आरोग्य आणि पोषण, कृषी, व्यवसाय आणि किरकोळ, फिनटेक, नेव्हिगेशन यांचा समावेश आहे.यासाठी नियम आणि अटी असून स्पर्धा फक्त भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा (MeitY) सर्व टप्प्यांवर निवडीबाबतचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल. या स्पर्धेविषयी माहितीसाठी आपण या लिंकला भेट देऊ शकता. त्याकरिता https://innovateindia.mygov.in/app-innovation-challenge/ अशी लिंक आहे.