नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ओडिशा येथील बालासोरला कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमींची भेट घेत धीर दिला. मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी मदत निधीची घोषणा केली. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंतप्रधानांनी पाहणी केली. मात्र, या सर्व घडमोडींदरम्यान त्यांनी पाचवेळा ड्रेस बदलविल्याची टीका काँग्रेसने केली आहे. यांसदर्भातला एक व्हिडिओदेखील काँग्रेसने व्हायरल केला आहे.
आजवरच्या रेल्वेच्या इतिहासातील मोठ्या अपघातांपैकी एक असलेल्या बालासोर येथील घटनेबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. देशभरातून संवेदना व्यक्त होताहेत. याचदरम्यान घटनेसाठी जबाबदार कोण म्हणत विरोधकांनी केंद्रावर टीकेची झोड उठविली आहे. ‘कुठे गेले कवच’ म्हणत सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी होऊ लागली आहे.
या दरम्यान अपघाताच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी दिवसभरातील त्यांच्या विविध कार्यक्रमांदरम्यान कितीदा कपडे बदलविले याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने ट्वीट केलेल्या एका व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांबरोबरच्या बैठकीत ओडिशा रेल्वे अपघाताची माहिती घेताना दिसत आहेत. ‘सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले, तर आपल्याला असा पंतप्रधान मिळाला आहे जो दिवसातून पाचवेळा ड्रेस बदलतो,’ अशी टीका हा व्हिडीओ ट्वीट करताना केरळ काँग्रेसने केली आहे.
शिवराज पाटलांच्या राजीनाम्याची आठवण
२००८ मध्ये मुंबई हल्ल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी दिवसभरात तिनदा ड्रेस बदलला म्हणून त्यांच्यावर टीका झाली. यानंतर शिवराज पाटलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, असे म्हणत काँग्रेसने शिवराज पाटलांप्रमाणेच विद्यमान पंतप्रधान आणि केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
https://www.facebook.com/IndianNationalCongress/videos/5979556658840355/?extid=CL-UNK-UNK-UNK-AN_GK0T-GK1C&mibextid=5Ufylb&ref=sharing
Odisha Train Tragedy PM Modi Dress Change Video