इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ओडिशा राज्यात बालासोरमध्ये झालेला हा रेल्वे अपघात रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात मानला जात आहे. या अपघातात आतापर्यंत सुमारे २७५ प्रवासी मृत्यूमुखी पडले असून हजारो जण जखमी झाले आहेत. अद्यापही मदत आणि बचाव कार्य सुरूच आहे. परंतु अनेकांनी आपल्या रक्तांनात्याचे जवळचे नातेवाईक गमावले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच जखमी व्यक्तींची ओळख मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्यातच अनेक मन हेलावणाऱ्या घटना समोर येत आहेत. परंतु मृतदेहांच्या ढिगाऱ्यामध्ये एका बापाने आपला मुलगा शोधला.
२३० किमीचा प्रवास
सदर भीषण रेल्वे अपघातामध्ये अनेक मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली आहेत. लोकांनी आपली जीवाभावाची माणसे शोधण्यासाठी पूर्ण असाच एक प्रसंग बालासोरच्या शवगृहामध्ये पाहायला मिळाला. आपला मुलगा जिवंत नाही, असे बहुतांशी कर्मचारी, प्रशासन सांगत असताना ‘त्याने ‘ आपल्या पोटचा गोळा सुखरुप असल्याचा विश्वास मनात असणाऱ्या बापाने मुलाला शवगृहातून त्याला जिवंत बाहेर काढले. हेलाराम मलिक असे त्या पित्याचे नाव असून त्यांचा मुलगा विश्वजीत मलीक मृतांच्या ढिगार्यामध्ये शवागारात त्यांना जिवंत आढळून आला आणि पित्याचे काळीज हेलावून गेले.
कोरोमंडल एक्सप्रेसमधून विश्वजीत मलिक (वय २४) तरुण प्रवास करत होता. परंतु या अपघातात त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यावर त्याच्या वडिलांनी विश्वास ठेवला नाही आणि आपल्या मुलाला शोधून काढण्यासाठी वडिलांनी कोलकातावरुन २३० किमीचा प्रवास करुन बालासोर गाठले. तिथे त्यांना त्यांचा मुलगा एका शवगृहात जिवंत सापडला. त्यानंतर त्यांनी त्याला पुढील उपचार करण्यासाठी कोलकत्याला परत नेले.
जखमी आणि बेशुद्ध
हेलाराम मलिक यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूच्या बातमीवर विश्वास ठेवला नाही. विश्वजीतची या अपघातनंतर एसएसकेएम या रुग्णालयात शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता त्याची पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करण्यात येईल. विश्वजीत या अपघातामध्ये गंभीर जखमी झाला होता. परंतु आता त्याची प्रकृती स्थिर आहे. हावडामध्ये दुकानदार असलेल्या हेलाराम मलिक यांनी विश्वजीतला रेल्वे स्थानकावर सोडल्यावर काही तासानंतर त्यांना या घटनेबद्दलची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी विश्वजीतशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पलीकडून त्यांना फक्त आक्रोश ऐकायला मिळाला.
यानंतर हेलाराम हे एक स्थानिक रुग्णवाहिका चालक यांच्यासोबत तात्काळ बालासोरसाठी रवाना झाले. पण गेल्यावर त्यांना त्यांचा मुलगा कोणत्याही रुग्णालयात सापडला नाही. खूप चौकशी केली, अखेर ते शवगृहात विश्वजीतला शोधण्यासाठी गेले. तिथे मृतदेहांचा खच पडला होता. एका मृतदेहाचा हात हलत शवगृहात एकच गोंधळ उडाला. आम्ही तिथेच असल्यामुळे ही सर्व घटना पाहत होतो. जेव्हा आम्ही तो हात हलताना पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आले की ही हात विश्वजीतचाच आहे. विश्वजीत तेव्हा गंभीर जखमी होता आणि पूर्णपणे बेशुद्ध होता. तात्काळ त्याला रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात आणले. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले.
Odisha Train Tragedy Father Found Son Railway Accident