इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सध्या ओडीशामध्ये तीन रेल्वेला झालेल्या अपघातात आतापर्यंत २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतू यापैकी ४० जणांना साधे ओरखडा किंवा खरचटलेले सुद्धा नाही. मग या प्रवाशांचे मृतदेह पाहून तपास अधिकारी देखील हैराण झाले आहेत. एवढा मोठा अपघात झाला तरी या प्रवाशांच्या शरीरावर साधे घसडले किंवा चरोटा देखील लागला नसल्याने त्यांच्या मृत्यूचा कारण शोधले जात आहे. या प्रकरणी आता वेगवेगळ्या शक्यता समोर येत आहेत. परंतु ठोस कारण मात्र अद्याप कळाले नाही.
यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू
अनेक वर्षापूर्वी रेल्वे या वाफेवर, कोळशावर चालत नंतर डिझेल इंजिने आली. आता अनेक ठिकाणी विजेवरच रेल्वे चालतात, या विजेचा दाब अतिप्रचंड असतो, त्यामुळे या ४० प्रवाशांचा मृत्यू विद्युतभारीत ओव्हरहेड वायर त्यांच्या बोगीवर कोसळल्यामुळे झाला असावा असा अंदाज लावला आहे. यादृष्टीने तपास सुरु केला आहे. जीआरपी सब इन्स्पेक्टर नाईक यांनी नोंदविलेल्या एफआयआरमध्ये याची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अनेक मृतदेह ओळखता येणार नाहीत, अशा अवस्थेत होते. तर ४० मृतदेह असे होते, त्यांच्यावर एकही जखमेचे किंवा रक्तस्त्राव झाल्याने काहीही पुरावे किंवा खूना नव्हत्या. ओव्हरहेड एलटी (लो टेंशन) लाईनच्या संपर्कात आल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला,असावा असे म्हटले जात आहे.
पोस्टमॉर्टम नंतर
यशवंतपूर म्हणजे बंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या बोगीला धडकली आणि तारा तुटल्या होत्या. रेल्वेच्या एका माजी अधिकाऱ्याने देखील हे शक्य असल्याचे म्हटले आहे. रेल्वेच्या वरच्या भागाला स्पर्श झाल्यानंतर या तारा बोगीतील आतल्या भागाला चिकटल्या असाव्यात. यामुळे विजेचा धक्का लागून बोगीतील सुस्थितीत असलेल्या प्रवाशांचा मृत्यू झाला. आता या मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या पुन्हा पोस्टमार्टम नंतर काही नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणावर लक्ष ठेवून चौकशी करीत आहेत.
Odisha Train Tragedy 40 dead bodies