इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अर्चना नाग सेक्स स्कँडलने सध्या ओडिशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) अनेक नेत्यांचा समावेश असलेल्या या खळबळजनक सेक्स स्कँडलची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधक सातत्याने करत आहेत.
दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आता या हायप्रोफाईल प्रकरणात एण्ट्री घेण्याची शक्यता आहे. केंद्रीय तपास यंत्रणेने ओडिशा पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित एफआयआरची प्रत मागितली आहे. पोलिसांनी अलीकडेच एका २६ वर्षीय महिलेला अटक केली होती.
भुवनेश्वर-कटकचे पोलीस आयुक्त सौमेंद्र प्रियदर्शी यांनी सांगितले की ईडीच्या अधिकाऱ्यांनी अर्चना नागच्या माजी साथीदाराने दाखल केलेल्या एफआयआरची प्रत मागितली आहे. महिलेने तक्रार केली होती की, काही वर्षांपूर्वी अचर्ना नागने तिच्या पेयांमध्ये आणि खाण्यात काही नशा मिसळले आणि नंतर काही अश्लील फोटो काढले. त्या चित्रांचा वापर करून सेक्स व्हिडीओ बनवण्यात आले आणि नंतर त्यांच्या मदतीने लोकांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोपही आहे. अर्चना नाग महिलांना वेश्या व्यवसायासाठी भाग पाडत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. प्रभावशाली लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी ती त्यांचा वापर करत होती.
पोलिसांनी तिच्या घरातून मोबाईल फोन, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि संगणक जप्त केला आहे. पोलिस आयुक्त म्हणाले की, “पोलिस या प्रकरणात आर्थिक व्यवहार आणि आर्थिक अनियमितता तपासू शकत नाहीत. जर खाजगी व्यक्तींचा सहभाग असेल तर ईडी किंवा आयकर विभाग या प्रकरणाची चौकशी करू शकतात.” ओडिशा पोलिसांनी अर्चना नाग हिच्या बँक खात्याच्या तपशीलासाठी रिझर्व बँकेला पत्र लिहिले आहे.
अर्चनाचे राजवाड्यासारखे घर
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, अर्चना नाग आणि त्यांचे पती जगबंधू चंद यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरनंतर ईडी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करेल. यामुळे ईडीला अटक, शोध आणि जप्ती तसेच गुन्ह्यातील रक्कम संलग्न करण्याचे अधिकार मिळतील.
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी अर्चना नाग यांची राजवाडा, अनेक महागड्या गाड्या आणि घोडा पाहून आश्चर्यचकित झाले. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अर्चना नाग आणि त्यांच्या पतीला सत्ताधारी पक्षाचे नेते तसेच केंद्र आणि राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक उच्च प्रोफाइल लोकांकडून मिळालेल्या निधीचा स्रोत ईडी शोधू शकते. ओडिया चित्रपट निर्माते अक्षय पारिजा यांनी गेल्या महिन्यात नाग आणि एका मुलीविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर अर्चना नागच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अनेक नेत्यांची छायाचित्रे
गेल्या काही आठवड्यांमध्ये अर्चना नाग यांची सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांसोबतची अनेक छायाचित्रे समोर आली आहेत, मात्र त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करणे पोलिसांना अवघड झाले आहे. राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की एकदा का ईडीने तपास सुरू केला की, अर्चना नाग आणि राजकारण्यांमधील कोणताही आर्थिक व्यवहार आगामी काळात बीजेडीसाठी लाजिरवाणा ठरू शकतो.
सीबीआय चौकशीची मागणी
एका एनजीओने ओरिसा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, अंमलबजावणी संचालनालयाकडून या प्रकरणाचा निष्पक्ष आणि योग्य तपास करण्यात यावा. राज्य पोलीस तपासात कोणतीही स्पष्ट प्रगती करू शकले नसल्याचा आरोप करत भाजपच्या महिला शाखेने या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. राज्य पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई न केल्यास मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या निवासस्थानाचा घेराव करण्याची धमकी पक्षाने दिली आहे.
Odisha Archana Nag High Profile Sex Racket