नाशिक : केंद्र सरकार ओबीसींचा इम्पेरीकल डाटा उपलब्ध करून देत नाही त्यामुळे ओबीसी आरक्षण संकटात आले आहे.पण तरीही केंद्र सरकार ओबीसींच्या प्रश्नावर मुग गिळून बसली तरी त्यांच्या जुजबी धोरणांच्या विरोधात कॉंग्रेस हल्लाबोल करणार आहे. कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने रविवारी दि.(२०) मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता रावसाहेब थोरात सभागृह येथे ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवी,ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी उपस्थित राहणार असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी दिली.
शिवाय ओबीसी मेळावाच्या निमित्ताने आगामी महानगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. भाजपच्या राज्यांतील नेत्यांनी देखील ओबीसींच्या प्रश्नावर राजकारण न करता केंद्र सरकारला ओबीसींचा इम्पेरीकल डाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी विजय राऊत यांनी केली.ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी लढा उभारणे,ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे,नॉन-क्रिमिलीयरची अट रद्द करणे , ओबीसी महामंडळाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणे अश्या विविध मागण्यांसाठी हल्लाबोल मेळाव्याच्या निमित्ताने ओबीसींचा आवाज केंद्र सरकार पर्यंत पोहचवण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभाग करत आहे.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय राऊत,उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, सरचिटणीस अनिल कोठुळे,सरचिटणीस यशवंत खैरनार, सचिव जनार्दन माळी ,मयूर वांद्रे,सहसचिव चारुशीला काळे, नाशिक जिल्हा ओबीसी विभागाचे अध्यक्ष सचिन कोठावदे,शहराध्यक्ष गौरव सोनार,प्रदेश ,सरचिटणीस जैनू पठाण,उत्तमराव बडदे,अशोक लहामगे,नंदकुमार येवलेकर,रोहन वेलदे,विशाल बागुल,विशाल सावंत,माया काळे,वैशाली थोरात,मौमुदिन शेख यांच्यासह पदाधिकारी मेहनत घेत आहे.