इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आरक्षणासाठी सरकारने मोठा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी समाज नाराज होऊ नये यासाठी सरकारने मोठा निर्णय़ घेतला आहे. आता ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहे. या समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील. तर उपसमितीत छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह आठ मंत्री असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर ओसीबींसाठीही उपसमितीच्या माध्यमातून विकासात्मक निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
ही समिती सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम आखणार आहे. ही समिती योजनांबाबतचे कामकाजही बघणार आहे. या समितीत भाजपचे चार, राष्ट्रवादी अजित पवार व शिवसेना शिंदे गटाचे दोन मंत्री असणार आहे. त्यात छगन भुजबळ, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे हे असणार आहे.
…….