नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात ओबीसीचा इंपिरिकल डेटा गोळा करण्यासाठी समर्पित आयोगाची नेमणूक करण्यात आली आहे. यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ओबीसींचा इंपिरिकल डेटा गोळा करणे म्हणजे शुद्ध गावंढळपना आहे अशी टीका करत या विरोधात आज अखिल भारतीय महात्मा फुले समता व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व नाशिक महानगरपालिका येथे तीव्र निदर्शने केली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने नाशिकची जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केलेनुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी मा. बांठीया यांचे अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. सदर आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयास अपेक्षित असलेला एम्पेरिकल डेटा दारोदार जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. परंतु आमचे असे निदर्शनास आले आहे की, आयोग वरील प्रमाणे माहिती संकलित न करता सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे , ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक असल्याचे म्हटले आहे.
तसेच सॉफ्टवेअरवर सामाजिक , राजकीय , आर्थिक परिस्थितीची माहिती जमा करणे म्हणजे ओबीसी समाजाचे भविष्यातील कायमस्वरूपी कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. त्यामुळे समर्पित आयोगाद्वारा चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे व तलाठी , ग्रामसेवक , अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांचे मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्यात यावे. अन्यथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधूने,शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी व शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, सरचिटणीस संजय खैरनार, ओबीसी सेलचे सुरेश आव्हाड, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, माजी नगरसेविका सुषमा पगारे,रंजना पवार, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख संतोष खैरनार, ज्ञानेश्वर शेवाळे,बाळासाहेब गीते, विनोद शेलार, आबा साळुंखे,मनोहर कोरडे आदी उपस्थित होते.
यावेळी मोतीराम पिंगळे, सलीम शेख, सुरेखा निमसे,नाना सोमवंशी अमर वझरे, उदय सराफ, भालचंद्र भुजबळ, हर्षल खैरनार रंजना गांगुर्डे, सागर लहामखेडे, जीवन रायते, निलेश जगताप, विशाल पुटींदे, नाना सोमवंशी, शेख आसिफ, जानोरीकर, शेख सलीमराज, औसफ हाशमी, नदीम शेख, विशाल डोके, अनिल जोंधळे, संतोष कमोद,विनोद डोके राहुल तुपे, रामेश्वर साबळे, अतुल चव्हाण, संदीप खैरे, विकी डहाळे, महेश भामरे, समाधान तिवडे, आसाराम शिंदे, योगिता पाटील, मीनाक्षी गायकवाड, सुमन तिवडे, सरला अहिरे, संदीप शिंदे, नाना महाजन, सागर बेदरकर, नदीम शेख, नईम शेख, कलीम पटेल, शादाब सय्यद, यश बागुल, प्रमोद पगारे, भुषण पाटील, प्रकाश महाजन, रोहित जाधव, भगवान पाटील, दीपक मंडलिक, गोरख शिंदे, भारती चित्ते, पांडुरंग काकड, देवानंद निकम, बाळू शिवराम, अल्ताफ इस्माईल, शंतनू घुगे, रविकांत हिरवे, महेंद्र हिरे,नाना पवार, शुभम जाधव, कचरु धोंगडे, रामदास गायकवाड, भगवान शिरसाट, राकेश शेवाळे, अक्षय पगारे, प्रवीण अहिरे, हरिभाऊ महाजन, सचिन कळासरे, जितेंद्र जाधव, गणेश मनोरे, महेश शेळके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.