पुणे – ओबीसींची सामाजिक, आर्थिक, राजकीय व जातनिहाय जनगणना सरकारी यंत्रणेमार्फतच होऊन इंपेरिकल डाटा उपलब्ध केला जाईल असा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुणे येथील बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुरव्याला यश मिळाले आहे.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष ए.व्ही.निरगुडे यांना भेटून आपल्या मागणीचे निवेदन सादर केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील ओबीसींची संपूर्ण सामाजिक, आर्थिक, राजकीय व जातनिहाय जनगणना सरकारी यंत्रणेमार्फतच होऊन इंपेरिकल डाटा उपलब्ध व्हावा अशी मागणी होती. यावेळी ओबीसींच्या विविध संघटनांनी निवेदन सादर केले होते.
त्यानंतर आज पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे सकाळी आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समता परिषदेसह इतर ओबीसी संघटनांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन आयोगाने आपल्या राज्यातील ओबीसींची आर्थिक, सामाजिक,व जातीनिहाय जनगणना शासकीय यंत्रणे मार्फत घ्यावी असा बैठकीत निर्णय घेतला. यावेळी समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.
समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आयोगाच्या बैठकीच्या ठिकाणी बाहेर दिवसभर ठाण मांडून बसले होते.यावेळी कार्यअध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई धाडगे, विभाग अध्यक्ष प्रमुख प्रितेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरिनाथ बनकर,जिल्हा अध्यक्ष अनिलजी लडकत, राजेंद्र नेवसे, अविनाश चौरे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख किशोर वचकल,शहर अध्यक्ष वैष्णवी ताई सातव, कविता खराडे,शिवराम जांभूळकर, उपाध्यक्ष पुणे शहर सुधीर होले,संघट पुणे शहर बनकर, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष चंद्रशेखर भुजबळ, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड वंदनाताई जाधव, जिल्हा अध्यक्ष शोभाताई शेवकर, अॅड.विद्या शिंदे ,हडपसर विधानसभा अध्यक्ष योगेशजी हिंगणे,अॅड.मंगेश ससाणे,अॅड.मृणाल ढोले, उपाध्यक्ष हडपसर विधानसभा संतोष कोद्रे,सुशांत सातव प्रकाश भुजबळ शिंपी समाजाचे प्रदेशअध्यक्ष संजय तुपसाखरे,गोसावी समाजाचे अध्यक्ष नंदकुमार गोसावी, अॅड.ज्ञानेश्वर पाटसकर,तेली समाजाचे अध्यक्ष अलका जगनाडे, कार्यअध्यक्ष सागर दरवडे,उपाध्यक्ष रामदास सुर्यवंशी, पुणेशहर वृषाली वाडकर, निलम वाघ,मुक्ता जांभूळकर, पल्लवी होले,बिना कट्टीमनी,संगीता बोराटे,सारीका पवार, वंदनाताई जाधव,अंनदा कुदळे, सुरेश गायकवाड, विशाल जाधव, प्रदिप हूमे,बंडू कचरे,हेमाताई शेलार यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे व ओबीसींच्या विविध संघटनेचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.