नाशिक – स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचविण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध न्याय मुद्यांवर केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सर्व ओबीसी संघटनांना आज राज्यभर रास्ता रोको आंदोलन केले. नाशिक शहरात द्वारका चौकात हे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी आरक्षण व इतर न्याय मागण्या संदर्भात बुधवारी नाशिक येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक झाली होती. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करत उद्या राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे आंदोलन राज्यभर झाले.