नाशिक : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस (ओबीसी विभाग) प्रदेश उपाध्यक्षपदी विजय राऊत तर सरचिणीसपदी अनिल कोठुळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच नाशिक शहर ओबीसी विभगाचे अध्यक्ष म्हणून गौरव वाघ व प्रदेश संघटक सचिवपदी चारुशीला काळे या नवीन चेहऱ्याना संधी देऊन कॉंग्रेस मजबुतीकरण करण्याकडे प्रयत्न सुरु केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी यांनी महाराष्ट्र दौरा करत ओबीसी विभागाच्या जिल्हावार बैठका घेऊन अहवाल अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीकडे पाठवण्यात आला राष्ट्रीय अध्यक्ष व छत्तीसगडचे गृह मंत्री ताम्रध्वज साहू यांच्या आदेशान्वये नवीन कार्यकारिणीस मान्यता देण्यात आली.देशांत ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे त्यामुळे ओबीसी विभागाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त ओबीसी घटकांना संधी देण्याचा पक्षाचा मानस आहे त्यामुळे कार्यकारिणी करतांना सर्व समाज घटकांना स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस ताकदीने लढणार असल्यामुळे ज्येष्ठ आणि तरुणांना देखील संधी देण्यात आली आहे. कॉंग्रेस मजबूत व्हावी यासाठी ओबीसी विभागाला बळकटी देण्यासाठी जुन्या कार्यकारिणी मध्ये बदल करून राज्यातील सर्व समाजातील घटकांना प्राधान्य मिळावे या हेतूने नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातून उपाध्यक्ष म्हणून माळी समाजातील कार्यकर्ते व शहर कॉंग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष विजय राऊत तसेच वीर शैव लिंगायत शिवा संघटनेचे अध्यक्ष अनिल कोठुळे,संघटक सचिव पदी चारुशीला काळे तर सचिव म्हणून अतिक मोइनुद्दिन अत्तार यांना प्रदेश कार्यकारिणी मध्ये स्थान देऊन पक्षाच्या बळकटीसाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
तसेच नाशिक शहर ओबीसी विभागाचे अध्यक्ष म्हणून गौरव वाघ या नवीन चेहऱ्याला संधी देऊन कॉंग्रेस मजबुतीकरण करण्याकडे प्रयत्न सुरु केला आहे.त्यांचे निवडीचे स्वागत शहराध्यक्ष शरद आहेर,माजी मंत्री शोभा बच्छाव,माजी आमदार जयप्रकाश छाजेड,कॉंग्रेसचे गटनेते शाहू खैरे,सरचिटणीस हेमलता पाटील,महिला कॉंग्रेस अध्यक्षा वत्सला काकू खैरे,ज्येष्ठ नेते उल्हास सातभाई,राजेंद्र बागुल,अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष हनीफ बशीर,सुरेश मारू,उद्धव पवार,विजय पाटील,ज्ञानेश्वर चव्हाण,सुनील आव्हाड,ज्येष्ठ नागरिक संघाचे उत्तमराव तांबे,उत्तमराव बडदे,प्रभाकर पाटील ,नंदकुमार येवलेकर मयूर मोटकरी,महेश गायकवाड ,अण्णा विधाते यांनी केले.