मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक! नुपूर शर्माचा डीपी लावल्याने युवकावर प्राणघातक हल्ला; ‘एनआयए’ चौकशी करणार?

by India Darpan
ऑगस्ट 6, 2022 | 7:37 pm
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात राहणाऱ्या प्रतीक पवार या युवकावर प्राणघातक हल्ला झाला आहे. समाज माध्यमांतून नुपूर शर्मा यांचे प्रतीकने समर्थन केल्यामुळे मुस्लीम युवकांनी त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. या हल्ल्याची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पद्धतीचे हल्ले या पुढील काळात सहन केले जाणार नाहीत, असा इशाराही आ. राणे यांनी यावेळी दिला.

आ.राणे म्हणाले की, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याप्रकरणी ४ ऑगस्टला अहमदनगर येथील कर्जत तालुक्यातील प्रतीक पवार या तरूणावर मुस्लीम तरूणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात पवार हा युवक गंभीर जखमी झाला. या हल्ला प्रकरणी फरार आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी ही त्यांनी केली.

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उदयपूर, अमरावती व आता कर्जत येथे घडलेली ही तिसरी घटना आहे. हिंदूवर वारंवारं हल्ले केले जात आहेत या पुढे हे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. धार्मिक भावना दुखवल्यावर घटनेचा जरूर निषेध करावा पण तो लोकशाही मार्गाने केला पाहिजे. शरीयत नुसार कायदा हाती घेऊन हिंदूंनां लक्ष्य करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी नमूद केले.

श्री. राणे म्हणाले की, भाजपाने नुपूर शर्मा यांच्या त्या व्यक्तव्याचे समर्थन केले नाही. त्यांना पक्षातून निलंबित केले. हा विषय आतासंपला असताना हिंदूवर असे हल्ले होत आहेत. हिंदु देव-देवतांची विंटबना केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्या प्रत्येक वेळी आम्ही लोकशाही मार्गाने अशा घटनांचा निषेध केला आहे. राज्यात मविआ सरकार नसुन हिंदुत्व जपणारे सरकार आहे, तेव्हा अशा प्रकारे हल्ले करण्याचे प्रयत्न कोणी करू नये.

Nupur Sharma Support Youth Attempt to Murder
Crime Karjat Ahmednagar

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोनाने टेन्शन वाढवले! महाराष्ट्रासह ७ राज्यांना केंद्राने दिले हे पत्र

Next Post

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

India Darpan

Next Post
jagdeep dhankhar

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती; मार्गारेट अल्वा यांचा पराभव

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011