मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रेषित मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर अडकलेल्या भारतीय जनता पक्षाची माजी प्रवक्ता नुपूर शर्माचा मुंबई पोलीस कसून शोध घेत आहेत. गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत तिचा शोध सुरू आहे, मात्र तिचा पत्ता लागत नसल्याचे वृत्त आहे. रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
गृह विभागाचे म्हणणे आहे की, भाजपमधून निलंबित करण्यात आलेली शर्माचा शोध घेता येत नाही. तिना अटक करण्यासाठी पोलिसांकडे पुरेसे पुरावे आहेत. मुंबई पोलिसांच्या पायधुनी पोलिस ठाण्यात नुपूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय शर्मा विरोधात ठाणे पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
नुपूरला प्रथम ई मेलवर बोलावण्यात आले होते. त्याचवेळी आता पोलीस स्वत:हून तिला बोलविण्यासाठी आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या असहकाराच्या वृत्तावर महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘हे खरे आहे. महाराष्ट्र पोलिसांचे प्रयत्न सुरू असून दिल्ली पोलिसांनीही मदत करावी.
गेल्या महिन्यात एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूरने प्रेषित मुहम्मद यांच्यावर टिप्पणी केली होती. तिच्या वक्तव्याचे पडसाद भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसून आले. कतार, पाकिस्तान, इराण, इराकसह 14 देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अखेर भाजपने तिला प्रवक्ते पदावरुन काढून टाकले आहे.