विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अतिशय जबरदस्त स्मार्टफोनचे लॉन्चिंग झाले आहे. तब्बल ६४ मेगापिक्सेलचे ३ कॅमेरे आणि गेमिंगचे भन्नाट फिचर असलेला हा ल्मार्टफोन आहे. प्रीमियम स्मार्टफोनच्या निर्माता असलेल्या झेडटीई कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनचे नाव ‘नुबिया झेड 30 प्रो’ असे आहे.
या जबरदस्त गेमिंग स्मार्टफोनचे ही काही खास वैशिष्ट्ये…
१) स्मार्टफोनमध्ये वर आणि खाली स्लिम बेझल आहे. सेल्फी कॅमेर्यासाठी होलसह पंच कटआउट आहे आणि मागील पॅनेलमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे. नुबिया झेड ३० प्रोच्या मागील बाजूस ३ डी नुबिया लोगो आहे, तो कॅमेरा मॉड्यूलच्या पुढे ठेवला असून, तो फोनला एक आकर्षक लुक देतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी द्वारा समर्थित आहे आणि तीन रॅम प्लस स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये देण्यात आला आहे.
२) नुबिया झेड ३० प्रोच्या ८ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत चीनमध्ये सीएनवाय ४,९९९ (म्हणजे सुमारे ५६,८०० रुपये) आहे. त्याच वेळी, १२ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सीएनवाय ५,३९९ (म्हणजेच सुमारे ६१,३०० रुपये) आहे.
जर आपल्याला हा फोन ब्लॅक गोल्ड लेजेंड कलरमध्ये विकत घ्यायचा असेल तर तो १६ जीबी प्लस ५१२ जीबी स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत सीएनवाय ५,९९९ (म्हणजे अंदाजे ६८,१०० रुपये) आहे. त्याचा सेल फोन २५ मे पासून होईल. परंतु भारतात किंवा इतर बाजारात बाजारात आणले जाईल की नाही? याबद्दल कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.










