नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पदवीधर वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG २०२३ चा निकाल मंगळवार, १३ जून रोजी प्रसिद्ध झाला आहे. तशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. ही परीक्षा ७ मे रोजी परदेशातील १४ शहरांसह भारतातील ४९९ शहरांमध्ये असलेल्या ४०९७ वेगवेगळ्या केंद्रांवर घेण्यात आली. सुमारे २० लाख ८७ हजार ४६२ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
गेल्या काही वर्षांत NEET UG परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १४,१०,७५५ वरून २०२० मध्ये १३,६६,९४५ विद्यार्थी, २०२१ मध्ये १५,४४,२७३ आणि २०२२च्या परीक्षेत १७,६४,५७१ विद्यार्थी झाले. यावर्षी NEET UG २०२३ परीक्षेसाठी एकूण २० लाख ८७ हजार ४९९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
NEET UG 2023 चा निकाल येथे पहा
१: सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या.
२: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
४: भविष्यातील संदर्भासाठी निकाल पहा आणि डाउनलोड करा.
मागील वर्षांचे NEET UG टॉपर्स
२०१८- कल्पना कुमारी (६९१ गुण)
२०१९- नितीन खंडेलवाल (७०१ गुण)
२०२०- सोयेब आफताब (७२० गुण)
२०२१- मृणाल कुत्तेरी (७२० गुण)
२०२२- तनिष्का (७१५ गुण)
१.७७ लाख वैद्यकीय जागा
या वर्षी देशभरातील १.७७ लाख वैद्यकीय जागांसाठी २० लाखांहून अधिक उमेदवार NEET UG परीक्षेला बसले होते. उपलब्ध जागांच्या संख्येच्या आधारे सर्वजण त्यांच्या श्रेणीनुसार उच्च वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्याचा प्रयत्न करतात. वैद्यकीय शिक्षणासाठी देशात सुमारे १ हजार वैद्यकीय महाविद्यालये असून, त्यात सुमारे अडीच लाख जागा आहेत.
भारतातील टॉप १० फार्मसी कॉलेजेस
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, हैदराबाद
जामिया हमदर्द, दिल्ली
बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, ऊटी
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, मोहाली
जेएसएस कॉलेज ऑफ फार्मसी, म्हैसूर
पंजाब विद्यापीठ, चंदीगड
मणिपाल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, मणिपाल
अमृता विश्व विद्यापीठ, कोईम्बतूर
NTA NEET UG 2023 Exam Result