नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जैन धर्मियांचे तिर्थ क्षेत्र असलेल्या चामरलेणी येथील श्री दिगंबर जैन, गजपथ ट्रस्टचे पाहड मंदिर परिसरातील कार्यालय फोडून चोरट्यांनी रोकडसह देवपुजेचे चांदीची भांडी लंपास केली. ही घटना गुरूवारी (दि.१३) रात्री घडली असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारस केशरनाथ जैन (रा.श्री दिगंबर जैन,गजपथ तिर्थक्षेत्र म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जैन धर्मियांचे गजपंथ हे तिर्थ क्षेत्र आहे. गजपथ ट्रस्टचे चामरलेणी येथे पाहड मंदिर असून मंदिरातच ट्रस्टचे कार्यालय आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी रात्री कार्यालयाचा दरवाजाचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेली रोकड व देवपूजेची चांदीची भांडी असा सुमारे ५५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.
लॅच लॉक खराब असल्याची संधी साधत भरदिवसा चोरी
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागरेनगर परिसरात लॅच लॉक खराब असल्याची संधी साधत चोरट्यांनी भरदिवसा घरात शिरून ३३ हजाराच्या ऐवज लंपास केला. ही चोरी करतांना चोरट्यांनी रोकडसह मोबाईल व रेडिओ चोरुन नेला. याप्रकरणी सुवर्णा प्रमोद पाटील (रा.श्री निवास रो बंगलो, सम्राट सिफोनी शेजारी इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटील या शुक्रवारी (दि.१४) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी लॅचलॉक खराब असल्याची संधी साधत भरदिवसा घरात घुसून कपाटातील रोकड तसेच मोबाईल व रेडिओ असा सुमारे ३३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.