नाशिक – ब्रेक द चेन अंतर्गत नाशिकमध्ये वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनला नाशिककरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच शनिवार आणि रविवार असे दोन्ही दिवस जवळपास सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. केवळ वैद्यकीय सेवा सुरू असून दूध व अन्य दैनंदिन सेवा सुरू आहेत. किराणा दुकानेही बंद असून नाशिककरांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात यश येणार आहे. या प्रतिसादामुळेच कोरोना बाधितांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
बघा, शहर परिसरातील स्थिती दर्शविणारे हे छायाचित्र
अशोकस्तंभ परिसर








