नाशिक – कोरोना बाबतची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी या दृष्टीने महापालिकेने शहरातील सर्व विभागीय कार्यालयांतर्गत कोविड – १९ विभागीय वॉर रूम स्थापन केली आहे. तशी माहिती अतिरिक्त आयुक्त तथा सीबीआरएस सिस्टीमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी दिली आहे.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने व नागरिकांना कोरोना बाबतची माहिती व सहकार्य मदत मिळण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील सर्व विभागीय कार्यालयांतर्गत कोविड -१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आले आहेत.याद्वारे नागरिकांना सी बी आर एस सिस्टिम,कोरोना केअर सेंटर,होम कोरंनटाइन व लसीकरण इत्यादी बाबतची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी २४x७ स्वतंत्र व्यवस्था विभागवार करण्याचे आदेश मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिले होते.
त्या अनुषंगाने नाशिक पूर्व ,नाशिक पश्चिम, पंचवटी नाशिक रोड,नवीन नाशिक,सातपूर या सहा विभागीय कार्यालयात कोविड -१९ विभागीय वॉररूम स्थापन करण्यात आले असून या वॉररूमच्या माध्यमातून नागरिकांना माहिती उपलब्ध होणार आहे.तरी नागरिकांनी त्यांच्या विभागातील माहिती साठी खालील क्रमांकांवर संपर्क करून माहिती घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तथा सी बी आर एस सिस्टीमचे प्रमुख सुरेश खाडे यांनी करण्यात येत आहे
विभागनिहाय वॉर रुम आणि संपर्क क्रमांक असे
१) नाशिक पूर्व
०२५३-२९४५२९५
२) नाशिक पश्चिम
०२५३-२५७०४९३
३) पंचवटी
०२५३-२५१३४९०
४) नाशिक रोड
०२५३-२४६०२३४
५) नवीन नाशिक
०२५३-२९४७२९५
६) सातपूर
०२५३-२३५०३६७