नाशिक – कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन सर्रासपणे लिहून दिले जात आहे. त्याची मोठी मागणी वाढली असून त्याचा काळाबाजारही सुरू झाला आहे. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन बिघडले आहे. सध्याच्या कोरोना संकटात आणखी एका मोठ्या समस्येने तोंड वर काढले आहे. मात्र, रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन नक्की गुणकारी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे की,
“जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या अभ्यासामध्ये रेमीडीसिविर कोविड-19 उपचारांमध्ये केवळ काही अंशी गुणकारी आहे असे दिसून आले आहे. त्यामुळे रेमीडीसिविर मिळाले की १००% बरे होणार आणि नाही मिळाले की मृत्यु अटळ अशी वस्तुस्थिती अजिबात नाही. परंतु ते मिळत नाही या हतबलतेमुळे मानसिक आघात होऊन बरेच जण खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे या औषधाचा नेमका उपयोग कधी कसा व कितपत आहे हे सर्वांना समजणे आवश्यक आहे. सर्व डॉक्टरांनी आपल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना याबाबत वस्तुस्थिती अवगत करून देणे अभिप्रेत आहे.”
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक