नाशिक – शहरातील सर्वाधिक वस्ती असलेल्या सिडको परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटात तब्बल ६५ बेडचे कोविड सेंटर सिडकोवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध झाले आहे. सावता नगर येथील सावरकर सभागृहात साकारलेलेले हे कोविड सेंटर नागरिकांसाठी निःशुल्क सेवा देणार आहे. याठिकाणी ऑक्सिजनचे ४४ आणि साधारण २१ बेड आहेत.
सिडको परिसरात महापालिकेचे कोविड सेंटर नाही. त्यामुळे सिडकोवासियांना डॉ. झाकीर हुसेन, बिटको हॉस्पिटलसह अन्य खासगी हॉस्पिटलमध्ये जावे लागते. परिणामी, बाधितांसह कुटुंबियांची खूपच धावपळ होते. या सर्व बाबीची दखल घेत शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि स्थानिक नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून हे कोविड सेंटर साकारण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आज सकाळी झाले आहे. हे सेंटर अवघ्या ४ दिवसातच साकारण्यात आले आहे.
असे आहे कोविड सेंटर
एकूण ६५ बेड (ऑक्सिजन बेड ४४, साधारण बेड २१)
वातानुकुलित अतिदक्षता विभाग
मनपा व खाजगी डॉक्टरांच्या सहकार्य
विनामूल्य उपलब्ध होणार
डॉक्टर, नर्स, वार्डबाय असा एकूण ३५ जणांचा स्टाफ
२४ तास उपलब्ध असणार
बेडची कमतरता भासल्यास पुढील आठवड्यात रायगड चौक येथे १०० खाटांचे कोविड सेंटर सुरू होणार
हे आहेत कोरोना योद्धे
डॉ. किरण बिरारी, डॉ.तुषार शिंदे, डॉ.भुषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे, डॉ. राहुल मटाले, डॉ. पूजा शेवाळे, डॉ. राजश्री पहाडी, डॉ. सोनाली धांगोले, डॉ. महिमा कुंभकर्ण, डॉ. सुनिता खैरनार तसेच परिचारिका मीनल लोणारे, प्रतिभा चौधरी, वैशाली शिंदे, स्वाती निकम, सविता ठाकरे आदी