मुंबई – तगडे रिटर्न्स मिळावे आणि आपला पैसाही सुरक्षित राहावा असे वाटत असेल तर राष्ट्रीय पेंशन योजना सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. याचे वैशिष्ट्य असे की निवृत्तीनंतर तुम्हाला यातून नियमीत उत्पन्न मिळू शकेल. मार्केट अभ्यासकांचे म्हणणे असे आहे की इक्विटी, प्रेफरंशियल शेअर आणि सरकारी बॉंडमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून एनपीएसने एकाच वर्षात भरपूर मोठे रिटर्न्स दिलेले आहेत.
गेल्या वर्षी १२-१७ टक्के रिटर्न
एनपीएस ग्राहकांना इक्विटीमधून एका वर्षात जवळपास १२.५ ते १७ टक्के रिटर्न मिळाले आहेत. प्रेफरंशीयल शेअरने १२-१४ टक्के नफा दिला आहे. तर सरकारी बॉंडमध्ये गुंतणुकीच्या माध्यमातून एनपीएस ग्राहकांनी १०-१५ टक्के रिटर्न कमावले आहे.
पीएफआरडीएचे लक्ष
एनपीएसला पेंशन फंड नियामक तसेच विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) अख्त्यारित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे, हे निश्चित. मॅच्युरिटीनंतर (६० वर्षांनी) तुम्ही ६० टक्के रक्कम काढूही शकता आणि त्यावर कुठलाही टॅक्स लागणार नाही.
निवृत्ती जवळ आली की वाढते सुरक्षा
तुमची निवृत्ती जवळ आली की पैशांची सुरक्षाही वाढत जाते. कारण सरकारी बॉंडमध्ये गुंतवणुकीची भागिदारीही वाढत जाते. निवृत्तीच्या वेळी तुमची एकूण गुंतवणुक सुरक्षित होऊन जाते.









