मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर ही माध्यमे हल्लीच्या काळात आपली मतं, भावना आणि विचार मांडण्यासाठी अतिशय महत्त्वाची झाली आहे. विशेष म्हणजे या माध्यमांवर कोणतेही बंधने नसल्याने प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. पण आता लवकरच ही माध्यमे वापरण्यासाठी आपल्यावर बंधन येणार आहे. कारण या समाज माध्यमांचा वापर करण्यासाठी लवकरच पैसे मोजावे लागू शकतात.
सोशल मीडियातील दिग्गज कंपनी मेटा लवकरच वापरकर्त्यांसाठी पेड फीचर्स सुरु करण्याच्या तयारीत आहे. या नवीन पेड फिचर्स युनिटचे प्रमुख प्रतिती रॉय चौधरी या असून, त्या अगोदर मेटाच्या संशोधन युनिटच्या हेड राहिल्या आहेत. स्नॅपचॅट आणि ट्विटरने यापूर्वीच पेड इन सेवा यापूर्वीच सुरु केल्या आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना ट्विटर ब्ल्यू आणि स्नॅपचॅट प्लस या सेवांचा लाभ मिळतो. एवढेच नाहीतर युजर्संना हे सोशल माध्यम विशेष सेवाही प्रदान करते.
द व्हर्जने याविषयीचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मेटा पेड फिचरसाठी न्यू मॉनेटायझेशन एक्सपिरिअन्स या नावाने वेगळा विभाग सुरु करणार आहे. व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकमधून महसूल गोळा करण्याची जबाबदारी या विभागाची असेल. या टीमची जबाबदारी युनिट प्रमुख प्रतिती रॉय चौधरी यांच्या खाद्यांवर असेल. कंपनीच्या आंतरिक पत्रव्यवहारातून अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पेड सर्व्हिसची चर्चा यापूर्वीही अनेकदा रंगली आहे. यंदाही याविषयीची चर्चाच रंगली असून अधिकृत माहिती अद्याप हाती आलेली नाही.
कंपनी जाहिरात खेचून आणण्यावर भर देत असून, जाहिरात व्यवसायवर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या युजर्सकडून पैसे घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे एका मुलाखतीत व्यवसाय आणि जाहिरात विभागाचे प्रमुख जॉन हेगमन यांनी कंपनीची धोरणं स्पष्ट करताना सांगितले होते. जाहिरात व्यवसाय वाढीवर लक्ष वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्नॅपचॅट, ट्विटर, मेटा यांच्या महसुलातील मोठा हिस्सा हा डिजिटल जाहिरातींमधून येतो. पेड फिचर्सच्या माध्यमातून कंपनी जाहिरातीविनाही कमाई करु शकते. हा कमाईचा नवीन मार्ग असेल, असे सांगण्यात येत आहे.
Now This Popular Mobile Apps Will be Paid