नवी दिल्ली – परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून देशाच्या विविध भागात पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा सुरू आहे. पासपोर्ट सेवा केंद्रात गेल्या सहा वर्षांपासून डिजिटल बदलांना सुरुवात झाली आहे. आता भारतीय डाक सेवेच्या माध्यमातून पासपोर्ट नोंदणी आणि त्यासाठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार आहे. डाकघराच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा सीएससी काउंटरवरून तुम्हाला अर्ज करता येऊ शकेल.
इंडिया पोस्टतर्फे नव्या सुविधेची घोषणा ट्विटद्वारे करण्यात आली आहे. आता जवळच्या डाकघरच्या सीएससी काउंटरवर पासपोर्टसाठी नोंदणी आणि अर्ज करू शकता येणार आहे. जवळच्या डाकघर येथून तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. भारतात पासपोर्ट कोणत्याही भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचा दस्तऐवज आहे. एखाद्याचे ओळखपत्र म्हणूनही पासपोर्टला ग्राह्य धरले जाते. शिवाय पासपोर्टशिवाय परदेशात प्रवास करताच येत नाही. पासपोर्टसाठी अर्ज करताना अनेक कागदपत्रे आवश्यक असतात.
कोणती कागदपत्रे आवश्यक
ओळखपत्र म्हणून आधारकार्ड, मतदानकार्ड किंवा कोणतेही वैध ओळखपत्र आवश्यक आहे. वयाचा दाखला, जन्मप्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला आदी. वाहन परवाना, पॅनकार्ड, आधारकार्ड, पत्त्यासाठी वीजबिल, पाण्याचे बिल, गॅस जोडणी, मोबाईचे बिल आदी. बँख खात्याचे पासबुक. सर्व पासपोर्ट अर्जप्रक्रिया ऑनलाइन झाली आहे. नवा पासपोर्ट बनविण्यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज कसा करावा
१) पासपोर्ट सेवेचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच passportindia.gov.in वर जा.
२) जुन्या युजर्सना जुन्या लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉग इन करणे शक्य
३) प्रथमच वापर करणार्यांना नव्याने नोंदणी करून नवे खाते तयार करावे लागेल.
४) होम पेजवर New User टॅबअंतर्गत Register Now वर क्लिक करावे.
५) त्यानंतर यूजर आयडी आणि पासवर्ड टाकावा. सत्यापनासाठी कॅप्चा कोड नोंदवा आणि रजिस्टरवर क्लिक करा.
६) आता नोंदणीकृत लॉगिन आयडीसोबत पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर लॉगिन करा.
७) लॉगिन केल्यानंतर पर्यायांपैकी एक निवडा आणि “ताजा पासपोर्ट/पासपोर्ट पुनः जारी” लिंकवर क्लिक करा.
८) अर्जावर लक्षपूर्वक आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करण्यासाठी अपलोड ई-फॉर्म लिंकवर क्लिक करा.
९) त्यानंतर सहेजे गए/ सबमिट केलेल्या अर्जावर पाहा. स्क्रिनवर अपॉइंटमेंट शेड्यूल करण्यासाठी पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट लिंकवर क्लिक करा.
१०) शेवटी अर्जाच्या पावतीची प्रिंटआउट घेण्यासाठी प्रिंट पर्यायावर क्लिक करा. पावतीवर अर्जाची रेफरेंस संख्या किंवा नियुक्ती संख्या असते, तिला जपून ठेवावे.