मुंबई – महिंद्रा कंपनीने ६०० आणि आणि ३० हजार टेम्पो ट्रक परत मागविल्यानंतर आता मोरिस गॅराजेज (MG Motors) कंपनीनेही त्यांच्या तब्बल १४ हजार कार परत मागविण्याचे जाहिर केले आहे. .एमजी मोटरने पहिल्या एसयूव्ही हेक्टरसोबत भारतीय बाजारात पहिले पाऊल ठेवले. बाजारात एंट्री करताच या एसयूव्हीने सेग्मेंटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले आहे. ग्राहकांच्याही या एसयूव्हीवर उड्या पडल्या आहेत. परंतु एमजी मोटर इंडियाने जवळपास १४ हजार हेक्टर वाहनांना माघारी बोलावले आहे.
ड्युएल-क्लच गेअरबॉक्स (डीसीटी) बीएस ६ हेक्टरच्या १४ हजार एसयूव्हींना माघारी बोलावले आहे. हरियाणाच्या मानेसर येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नोलॉजीमध्ये ही वाहने उत्पादन परीक्षणात अपयशी ठरली आहेत. या परीक्षणात हायड्रोकार्बन आणि एनओक्स उत्सर्जनात काही त्रुटी आढळल्या आहेत. आयसीएटीच्या म्हणण्यानुसार, सॉफ्टवेअरमध्ये एक समस्या निर्माण झाली आहे. सॉफ्टवेअरला री-फ्लॅशिंग आणि अपडेट करून त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात. इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीच्या सहाय्यानेच या निष्कर्षाचे सत्यापन करण्यात आले आहे. एमजी कंपनी आयसीएटीच्या समाधानसाठी औपचारिक मंजुरीची प्रतीक्षा करत आहे. त्यानंतरच ग्राहकांना सूचित करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतरच कंपनीचे डिलर ग्राहकांना संपर्क करणार आहेत.
सर्व काही सुरळीत चालले (कोरोना परिस्थिती) तर आगामी डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व नादुरुस्त हेक्टर वाहनांच्या सोफ्टवेअर फ्लॅशिंग प्रक्रियेला पूर्ण करण्यात येणार आहे. आतापर्यंत कंपनीने हेक्टरच्या ६० हजारांहून अधिक वाहनांची विक्री केली आहे. कंपनीने नुकतेच फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केले होते. त्यामध्ये काही आवश्यक अपडेट्ससह काही बदल करण्यात आले होते. कंपनीने नव्या एमजी हेक्टरमध्ये १.५ लिटरच्या क्षमतेचे पेट्रोल इंजिन आणि २.० लिटर क्षमतेचे डिझेल इंजिनचा प्रयोग केला आहे. १३.४९ लाख रुपयांपासून ते १९.२० लाख रुपयांपर्यंत हेक्टरची किंमत आहे.