मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शासनाच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक असते. तसेच नागरिकांना वीज बिल भरणे, इन्कम टॅक्स भरणे आदी गोष्टी आदी आवश्यक बाबींची पूर्तता करणे वेळेअभावी शक्य नसते. परंतु तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेल्यास किंवा रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी स्टेशनवर थांबल्यास आपल्याला अशा प्रकारच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतात. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु हे वास्तविक सत्य आहे की रेल्वे स्टेशन वर देखील आता शासनाच्या या योजनेचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. कारण लवकरच तुम्हाला रेल्वे स्टेशनवर मोबाईल रिचार्ज, वीज बिल, कर भरणे यासारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
रेलटेलने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, कॉमन सर्व्हिस सेंटर या सेवेवर या सुविधांचा लाभ घेऊ शकतील. ही योजना ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड आणि आयटी मंत्रालयाच्या सहकार्याने काही ठिकाणी सुरू केली जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. ही सेवा गाव पातळीवरील स्थानिक उद्योजक चालवतील. तिकिट बुकिंग, आधार कार्ड, मतदार कार्ड, मोबाईल रिचार्ज, वीज बिल, पॅन कार्ड, बँकिंग विमा यासारख्या सुविधांचा लाभ CSC वर घेता येईल, असे निवेदनात म्हटले आहे. किऑस्कने त्याला ‘रेल वायर साथी कियोस्क’ असे नाव दिले आहे.
एका निवेदनानुसार, उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि प्रयागराजमध्ये या सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जातील. त्याचप्रमाणे, किऑस्क देशभरातील 200 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा देणार आहेत. ज्यामध्ये अधिक ग्रामीण भागांचा समावेश आहे. या टप्प्यात दक्षिण मध्य रेल्वेची 44, उत्तर सीमा रेल्वेची 20, पूर्व मध्य रेल्वेची 13, पश्चिम रेल्वेची 15, उत्तर रेल्वेची 25, पश्चिम मध्य रेल्वेची 12, पूर्व किनारपट्टीची 13, उत्तर पूर्व रेल्वेची 56 स्थानके आहेत. ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
रेलटेलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनीत चावला म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा विविध ई-गव्हर्नन्स सेवांचा लाभ घ्यावा लागतो परंतु यात अडचणी येतात किंवा पायाभूत सुविधा, संसाधने तसेच माहितीच्या अभावामुळे इंटरनेटचा वापर करणे कठीण होते. मात्र डिजिटायझेशनचा लाभ घेण्यासाठी हे ‘रेल्वे साथी किऑस्क’ ग्रामीण लोकसंख्येला मदत करण्यासाठी या अत्यावश्यक डिजिटल सेवा ग्रामीण रेल्वे स्थानकांवर पोहोचवतील.