नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वस्तू आणि सेवा करासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विविध वस्तू आणि सेवांवर लावला जाणारा हा कर आता काही मान्यवरांनाही लागणार आहे. अतिथी शिक्षक, अतिथी विद्वान आणि दुसऱ्यांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणारे लाइफ स्टाइल गुरू व कवी यांचे वार्षिक उत्पादन २० लाख रुपये व त्यापेक्षा जास्त असेल तर त्यांना आयकराव्यतिरिक्त आता १८ टक्के जीएसटीसुद्धा द्यावा लागणार आहे. यापूर्वी त्यांना जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमांना भेट देणार्या विद्वान किंवा कवीचे उत्पन्न २५ लाख रुपये असल्यास त्याला प्राप्तिकर आणि उपकर म्हणून ५.०७ लाख रुपये भरावे लागतात. परंतु आता त्याला १८ टक्के GST म्हणून ९० हजार रुपये अधिक भरावे लागतील. म्हणजेच एकूण ५.९७ लाख रुपये कर म्हणून कपात केली जाईल. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने नव्याने स्पष्टीकरण देताना ही माहिती सांगितली आहे.
बॅटरीशिवाय विकली जाणारी इलेक्ट्रिक वाहनेही स्वस्त होतील. यावरील जीएसटी २८ टक्क्यांवरून केवळ ५ टक्के करण्यात आला आहे. यापूर्वी देखील बॅटरीसह विकल्या जाणाऱ्या वाहनांवर ५ टक्के जीएसटी लागू होता. यापुढेही तेच लागेल. बॅटरीसह आणि शिवाय वाहने खरेदी करणे हे सरकारने खरेदीदाराच्या निर्णयावर सोडले आहे. फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना टोलमध्ये दिलासा मिळणार आहे. फास्टॅग वापरत नसलेल्या चालकांना टोल टॅक्स व्यतिरिक्त पैसे द्यावे लागतील. या पेमेंटवर १८ टक्के GST भरावा लागणार होता. आता सरकारने हा कर हटवला आहे.
याशिवाय सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील शुद्ध केलेले पाणी आता शुद्धिकृत पाण्याच्या श्रेणीच्या बाहेर राहील. त्यावरील १८ टक्के जीएसटी हटविण्यात आला आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क बोर्डाने ताज्या स्पष्टीकरणात ही माहिती दिली आहे. त्यानुसार, आता बांधकाम खर्चात कपात होईल. कारण विना मिरर पॉलिसच्या नेपा स्टोनवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून घटवून ५ टक्के करण्यात आला आहे.
विना बॅटरीच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. कंपनी कर्मचाऱ्यांच्या टूरसाठी एक वेळ भाड्यावर घेतल्या जाणाऱ्या वाहनांवर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमच्या (आरसीएम) माध्यमातून लागणाऱ्या ५ टक्के जीएसटीत सूट देण्यात आली आहे. टोलनाक्यांवर विना फास्टॅग वाहनांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात येत होता. तोदेखील आता हटविला आहे.
Now These Personalities Will also have to pay 18 Percent GST
Guest Lecturer Poet Scholars Life Style Guru Celebrity Personality