नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऐन पावसाळ्यात पुन्हा एक चिंताजनक वृत्त आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्याृेत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्यात आली आहे. मास्क घातला नसेल तर ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. दिल्लीपाठोपाठ आणखी कुठल्या राज्यात मास्क सक्ती होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महाराष्ट्रात बुधवारी (१० ऑगस्ट) १८४७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले. त्यात मुंबईमध्ये ८५२, नाशकात ६ आणि नागपूरमधील १९ रुग्णांचा समावेश आहे. तर, बुधवारी १८४० जणांनी कोरोनावर मात केली.
दिल्लीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढीने डोके वर काढले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. एएनआयने याबाबतचे वृत्त दिले असून दिल्लीमधील अरविंद केजरीवाल सरकारने मास्कसक्तीबाबतचा निर्णय घेतला आहे. कारमधून प्रवास कऱणाऱ्या लोकांना मास्क बंधनकारक नसणार आहे. कारमधून विना मास्क लोक प्रवास करु शकतात. पण सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असणार आहे.
दिल्लीत गेल्या २४ तासात २१४६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या १८० दिवसातली ही सर्वाधिक मृतांची संख्या आहे. दरम्यान, याआधी १३ जानेवारीला दिल्लीत १२ रुग्ण कोरोनामुळे मृत झाले होते. मंगळवारी दिल्लीत २४९५ कोरोना रुग्ण आढळून आले. पॉझिटिव्हिटी रेट हा १५.४१ इतका असल्याचे समोर आले आहे. तर सहा जणांचा मृत्यू झालाय. याआधी २१ जानेवारीला दिल्लीचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा १८.०४ टक्के इतका होता. दिल्लीत गेल्या दहा दिवसांत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. तर २२ जुलै ते ३१ जुलै दरम्यान १४ रुग्ण दगावले होते. दिल्लीतील १ ऑगस्ट ते १० ऑगस्टमधील मृतांची आकडेवारी ४० रुग्ण दगावले असल्याचे समोर आले आहे.
देशभरात १६ हजार २९९ नवे रुग्ण
दिल्लीमध्ये ओमयक्रॉनचे बीए फोर आणि बीए फायईव्ह सब वेरीएंटचे अनेक प्रकरणे आढळून आले आहेत. त्यामुळे संक्रमणाचं प्रमाण दिल्लीत वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशात १६ हजार २९९ कोरोना रुग्णांची भर पडल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर देशाचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.५८ इतका आहे. दिल्लीतल वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातही सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात येणार आहे.
Now Mask is Compulsory in this State of India
Corona Covid19 New Delhi Capital