मुंबई – लहानांपासून अगदी ज्येष्ठांपर्यंत अनेकांना आइस्क्रीम खूपच आवडते. कोणत्याही सिझनमध्ये आइस्क्रीम खाणारे अनेक खवय्ये आहेत. त्यांच्यासाठी थोडी वाईट बातमी आहे. आइस्क्रीम खरेदीसाठी आता जास्त पैसे अदा करावे लागणार आहेत. कारण आइस्क्रीम खरेदीवर १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाच्या परिपत्रकानुसार, आधीपासून तयार केलेले आइस्क्रीम आइस्क्रीम पार्लर विक्री करतात. त्यांना रेस्टॉरंटच्या श्रेणीत ठेवता येणार नाही. यामध्ये स्वयंपाकाची कोणतीही क्रिया नसते. विक्रेते केवळ आइस्क्रीमचीच विक्री करतात, हे त्यांचे एकच काम आहे. हे काम सेवा क्षेत्रात येत नाही. तरीही सेवेचा समावेश झाला तर त्यावर १८ टक्के जीएसटी लागेल.
महामारीमुळे नोकर्या गेल्यामुळे तसेच वेतनात कपात झाल्यामुळे भारतीय नागरिकांच्या बचतीवर परिणाम झाला आहे. इंडिया लँड्स आणि कोझीकोड येथील आयआयएमच्या ई-सेलच्या एका सर्वेक्षणानुसार, कर्मचारी आणि वेतन कपातीमुळे ८५ टक्के भारतीयांना भविष्याची चिंता सतावत आहे. महामारीदरम्यान सरकारकडून देण्यात आलेला मोरेटोरियमचा लाभ अनेक कर्मचार्यांना मिळू शकला नाही.
सर्वेक्षणात सहभागी २५ टक्के कर्मचार्यांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. स्वयंरोजगार करणार्या ३४ टक्के नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे. दुसर्या लाटेमुळे ६६ टक्के २१ ते २५ वर्षांच्या युवकांची आर्थिक स्थिती प्रभावित झाली आहे. सर्वेक्षण १४०० नागरिकांशी बोलून करण्यात आले आहे.