नवी दिल्ली – प्रदूषणाचे संकट कालानुरुप कमी होण्याऐवजी व्यापक स्तरावर वाढत असून मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवत आहे. प्रदूषणाला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. घरामध्ये असो अथवा बाहेर असो, प्रत्येक ठिकाणी त्याचा दुष्परिणाम दिसत आहे. दरवर्षी लोकांना प्रदूषणामुळे दमा, श्वासाच्या विकारासह इतर गंभीर आजार होत आहेत. घर आणि घराबाहेर होत असलेले प्रदूषण हे त्यामागील मोठे कारण आहे. लोकसंख्येच्या मोठ्या गटाला प्रदूषणाचा फटका बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीने एक विशेष प्रकारचे प्रदूषण शोषून घेणारे कापड तयार केले आहे.
आयआयटी करणार पेटंट
या कपड्याचा खिडक्या, दरवाज्यांवर पडद्याच्या रुपात वापर केला तर बाहेरील प्रदूषण घरात येऊ शकणार नाही. या कपड्याच्या पेटंटसाठी आयआयटीने अर्ज केला आहे. कपडा आणि फायबर इंजिनिअरिंग विभागाच्या प्रा. अश्विनी अग्रवाल सांगतात, कण पदार्थ, नायट्रस ऑक्साइड, सल्फल ऑक्साइड, कार्बन ऑक्साइड आणि इतर विषारी बाष्पशील कार्बनिक कंपाउंड (व्हीओसी) च्या वाढत्या स्तरामुळे वायू प्रदूषण धोकादायक झाले आहे. या रसायनांच्या प्रति दशलक्षच्या काही भागाच्या संपर्कात राहिल्यास आरोग्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम होतात. दमा, डोळ्यांची तसेच गळ्यात जळजळ होणे आदी आजार संभावतात. माणूस अधिक वेळ इमारतीत असतो. तेच लक्षात घेऊन हे कापड तयार केले आहे.
सहाशे पटीपेक्षा अधिक विषारी वायू शोषणार
वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, सुती कपड्याला विकसित करण्यात आले आहे. रसायनाच्या मदतीने तयार करण्यात आलेला विकसित कापड ६०० पटीपेक्षा अधिक विषारी वायून शोषून घेऊ शकणार आहे. हे कापड तयार करण्यासाठी झिंक नायट्रेट हेक्साहायड्रेट, मिथाइलिमिडाजोल, कोबाल्ट नायट्रेट हेक्साहायड्रेट, सोडिअम हायड्राक्साइड, मेंथॉलसह इतर रसायनांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक रसायनाचा वापर केल्यानंतर त्याचे परीक्षण करण्यात आले. आयआयटीने सध्या दोन प्रकारचे कापड तयार केले आहे. त्याला रसायनाच्या आधारवरून झेडआयएफ-६७ आणि झेडआयएफ-आठ असे नाव देण्यात आले आहे. एका कपड्याचा रंग पांढरा तर दुसर्याचा जांभळा रंग आहे.
तीन प्रदूषण तत्वावर परीक्षण
वेळ–प्रदूषण तत्व शोषून घेण्याचे प्रमाण (मिलीग्रॅममध्ये)
३० मिनिटे अॅनिलिन ११.२७
२० मिनिटे बेंझिन १२.४
एक तास स्टायरिन ६.२४
(नोट – कापड प्रतिग्रॅम)