इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – देशातील चार राज्यांमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर भाजपने आता त्यांचे लक्ष्य गुजराकडे वळविले आहे. गुजरातमध्ये येत्या काही महिन्यातच निवडणुका होणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अहमदाबादमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला. चारही राज्यातील विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा रोड शो घेण्यात आला. या रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. अहमदाबाद विमानतळापासून या रोड शोला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या नागरिकांनी मोदी यांचे स्वागत केले. तसेच, नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. बघा या रोड शोचा व्हिडिओ
https://twitter.com/BJP4Gujarat/status/1502155115347976197?s=20&t=TSG9qtWjmz6iSpKeez-VMQ