मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –सांस्कृतिक वारशाचे संवर्धन करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) आणि महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालय यांनी प्राचीन कलाकृतींच्या विश्लेषणासाठी न्यूट्रॉन-आधारित विना-विध्वंसक तंत्राचा वापर करण्यासाठी सामंजस्य करार केला.
या करारावर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम बीएआरसी येथे झाला. यावेळी बीएआरसी मधील भौतिकशास्त्र विभागाचे संचालक डॉ. एस.एम. युसूफ आणि पुरातत्व विभागाचे संचालक सुजितकुमार उगले उपस्थित होते.
‘बीएआरसी’चे संचालक, विवेक भसीन यांनी या उपक्रमाबद्दल उत्साहाची भावना व्यक्त केली. ते म्हणाले, हा सामंजस्य करार पुरातत्व संशोधनात प्रगत ‘इमेजिंग’ तंत्राच्या वापरास प्रोत्साहन देईल. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. ए.के. मोहंती यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आपली समज वाढवण्यासाठी डीएई संशोधन अणुभट्ट्यांचा वापर करण्याच्या सामाजिक फायद्यांवर भर दिला.
सांस्कृतिक कलाकृतींच्या संरचनात्मक रचना आणि ऐतिहासिक संदर्भामध्ये अधिक जाणून घेण्यासाठी न्यूट्रॉन इमेजिंगच्या अद्वितीय क्षमतांचा उपयोग करणे हे या सहयोगाचे उद्दिष्ट आहे. न्यूट्रॉन-आधारित पद्धती त्याच्या गैर-विध्वंसक स्वरूपामुळे आणि विविध प्रकारच्या विशेषतः मौल्यवान सामग्रीमध्ये प्रवेश करण्याच्या क्षमतेमुळे प्राचीन वस्तूंची कारागिरी आणि उत्पादन तंत्राबद्दल महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते.