विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
व्हॉट्सअॅपची प्रायव्हेट पॉलिसी १५ मेपासून लागू होणार आहे. त्यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयासमोर सरकार आणि व्हॉट्सअॅपला उपस्थित राहायचे आहे. मात्र इंटरनेटशी निगडित सर्व अॅपची आमच्यासारखीच पॉलिसी आहे, असे व्हॉट्सअॅपने आपल्या प्रायव्हेट पॉलिसीवरून दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात म्हटले आहे. बिग बास्केट, कू, ओला, ट्रू कॉलर, झोमॅटो आणि आरोग्य सेतू अॅपसुद्धा युजर्सची माहिती घेतात,असे व्हॉट्सअॅपने न्यायालयासमोर सांगितले आहे.
Inc42 च्या वृत्तानुसार, व्हॉट्सअॅपने ५ मे रोजी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये इतर अॅपकडून युजर्सची खासगी माहिती घेत असल्याबद्दल व्हॉट्सअॅपने टीका केली आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या प्रतिज्ञापत्रात गुगल, मायक्रोसॉफ्ट, झूम आणि रिपब्लिक वर्ल्ड चेसुद्धा नाव घेतले आहे.
भारतात जर आमच्याविरुद्ध कारवाई झाल्यास ऑनलाइन सेवा देणाऱ्या किराणा मालाचे अॅप आणि डॉक्टरांची अपॉईंटमेंट घेणाऱ्या अॅपवरही परिणाम होणार आहे, असा दावा व्हॉट्सअॅपने केला आहे. प्रायव्हेट पॉलिसी फक्त बिझनेस अकाउंटसाठी असल्याचे व्हॉट्सअॅपने आधीच स्पष्ट केलेले आहे. बिझनेस अकाउंटवर होणारी चॅटिंग व्हॉट्सअॅप वाचणार असून ती फेसबुकला शेअर करणार आहे. खासगी चॅटिंगबाबत नव्या पॉलिसीशी काहीच देणेघेणे नाही., असे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.
१५ मेनंतर व्हॉट्सअॅपकडून युजर्सना एक नोटिफिकेशन पाठविण्यात येणार आहे. परंतु अकाउंट डिलिट करणार नाही. काही दिवसांनंतर युजर्स व्हॉट्सअॅपचे काही फिचर वापरू शकणार नाही. म्हणजेच मेसेचे नोटिफिकेशन मिळतील, परंतु ते त्यांना वाचता येणार नाहीत, असे व्हॉट्सअॅपकडून सांगण्यात आले.