नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरीप हंगाम 2022-23 करिता शेतकऱ्यांसाठी निविष्ठा, बी-बियाणे, खते, कीटकनाशके याबाबतच्या येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याकरीता नाशिक विभागीय व जिल्हा स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
प्रसिद्धी पत्रकात नमूद केल्यानुसार, नाशिक विभाग, जिल्ह्यातील शेतकरी बंधू व महिला शेतकरी यांना निविष्ठा, बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबत कोणतीही तक्रार असल्यास, खालील नियुक्त केलेल्या कक्ष अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विवेक सोनवणे यांनी केले आहे.
येथे करता येणार तक्रार
– नाशिक विभागीय स्तर : दिलीप भोये, भ्रमणध्वनी क्रमांक 8208628168
– नाशिक जिल्हास्तर : लितेश येळवे, भ्रमणध्वनी क्रमांक 8208561986