अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय हवामान खात्याने जिल्हयात 14 एप्रिल, 2023 पर्यंत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली असुन नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेत खालीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.
ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स् पासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे.
जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
आपत्कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्षातील, दुरध्वनी क्र.1077 (टोल फ्री), 0241-2323844 वा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासमार्फत करण्यात आले आहे.
12 april,
Warnings are issued by IMD for next 5 days in Maharashtra. Thunderstorm with accompanied with lightning, gusty winds & hail at isolated places in parts of Madhya Mah on day 2 & 3.@RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/JKvi75s4Bj— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 12, 2023
North Maharashtra Unseasonal Rainfall Alert