इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग-उन हा त्याच्या आगळ्यावेगळ्या कृती आणि साहसांमुळे अनेक वेळा चर्चेत असतो. तसेच उत्तर कोरिया हा अनेक गोष्टीत गुप्तता पाळणारा देश मानला जातो. कारण इथल्या गोष्टी क्वचितच बाहेरील जगापर्यंत पोहोचतात. जगात अद्यापही काही देशांमध्ये तेथील शासनकर्ते किंवा हुकूमशहा हे जनतेवर निर्बंध लादतात. त्यामुळे जनतेला त्या आदेशाचे पालन करावे लागते. त्यापैकी एक असलेल्या किम जोंग यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्याची सर्व जगभर चर्चा होते. आताही तो चर्चेत आला हे तो त्याच्या पत्नीमुळे. किम जोंग उन बऱ्याच दिवसांनी पत्नीसोबत दिसला. त्याची पत्नी री सोल जू सोबत तो गेल्या पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच दिसला. किम जोंगची पत्नी हे एक रहस्य असल्याचे म्हटले जात आहे.
‘नॉर्थ कोरिया लूनार न्यू इयर’च्या आर्ट गॅलरी कार्यक्रमात किम सपत्नीक सहभागी झाला. यावेळी किम आणि त्याची पत्नी देखील कलाकारांसोबत भेटली. कोरोनामुळे किम जोंग उन आणि त्याची पत्नी हे दोघेही घरातच विलगीकरणात राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान दोघेही मुलांसोबत वेळ घालवत होते. किम जोंग उन आणि री सोल जू यांना तीन मुले आहेत. जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणानंतर उत्तर कोरियाने सीमावर्ती भागात निर्बंध वाढवला होता. कोरोनामुळे किम जोंग उन आणि त्यांचे कुटुंबीय अजूनही क्वचितच बाहेर पडतात.
किम जोंग उनची पत्नी री सोल नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी त्याच्या हत्येचीही बातमी आली होती. मात्र, ही बातमी निव्वळ अफवा ठरली. किम जोंग उनची पत्नी अत्यंत साधी राहते आणि अनेकदा मीडियापासून दूर राहते. तिला रहस्यमय देखील म्हटले जाते कारण ती एक चीअरलीडर आहे. रिपोर्ट्सनुसार, किम जोंग उन आपल्या पत्नीच्या भूतकाळातील इतिहासाबद्दल खूप चिंतेत आहे. अधिकार्यांनी री सोल जूचा गत जीवन इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि री सोल जू वैशिष्ट्यीकृत फोटो आणि व्हिडिओ हटवले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये किम जोंग उनच्या वडिलांच्या पुण्यतिथीला उपस्थित राहण्यासाठी कुमसुम शहरात आल्यावर दोघांना शेवटचे एकत्र पाहिले गेले होते. किम आणि जू यांनी २००९ मध्ये लग्न केले, जरी री सोल यांना २०१२ मध्ये उत्तर कोरियाची प्रथम महिला म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली.