नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – जगात असा शक्यतो असा कोणीही शिक्षित व्यक्ती नसावा की, ज्याला उत्तर कोरियाचा ‘हुकूमशहा’ किम जोंग-उन हा माहित नाही. किम जोंग त्याच्या आगळ्यावेगळ्या साहसांमुळे बर्याचदा चर्चेत असतो. तसेच उत्तर कोरिया हा अनेक गोष्टीत गुप्तता पाळणारा देश मानला जातो. कारण इथल्या गोष्टी क्वचितच बाहेरील जगापर्यंत पोहोचतात. किम जोंग यांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे त्याची सर्व जगभर चर्चा होते. जगात अद्यापही काही देशांमध्ये तेथील शासनकर्ते किंवा हुकूमशहा हे जनतेवर निर्बंध लादतात. त्यामुळे जनतेला त्या आदेशाचे पालन करावे लागते. काहीवेळा तर हे राज्यकर्ते अजब कायदा किंवा आदेश काढून त्याच्या अंमलबजावणीचा हुकुम सोडतात.
उत्तर कोरिया हा असाच एक देश जेथे एक हुकुमशाही शासक असून तेथील जनता गेली कित्येक वर्ष जणू पारतंत्र्यात असल्याप्रमाणे राहत आहे. विशेष म्हणजे तेथील जनतेला इंटरनेट आणि चित्रपट पाहण्यावर बंदी आहे, विशेष म्हणजे सरकारविरोधात बोलण्याची देखील परवानगी नाही. या जनतेवर काही महिन्यांपूर्वी आणखी एक जुलमी आदेश लादण्यात आला आहे. तो आदेश म्हणजे आवडते कपडे घालण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी होती.
इतकेच नव्हे तर मागील वर्षी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी बोलवलेल्या पक्षाची एका बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतल्या कारणांमुळे ते आणखी चर्चेत आले होते. या बैठकीत किम जोंग-उन यांनी म्हणून आपला दर्जा उंचावत स्वत: ची सरचिटणीसपदी निवड केली आहे. तर त्याची बहीण किम यो-जंग हिला उत्तर कोरियाच्या प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या अंतर्गत समितीतून बाहेर काढले आहे. तसेच या देशात काय अण्वस्त्रांची चर्चा सुरू असते जगात सर्वात बलशाली नेता बनण्यासाठी किंग जॉन कायमच आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत असतो.
परंतु आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल अशी घटना नवीन वर्षात घडताना दिसून येत आहे असे म्हटले जाते की, जगात क्रूर हुकूमशहाची प्रतिमा असलेला उत्तर कोरियाचा शासक किम जोंग उन याच्या मनात बदल झाला आहे ! नवीन वर्षात किम जोंग उनची प्रतिमा बदलणार आहे ! कारण गेल्या वर्षानंतर किम जोंग उनने नवीन वर्षासाठी जी उद्दिष्टे ठेवली आहेत, ती यापूर्वी कधीही दिसली नाहीत. सन २०२१ च्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी आपल्या भाषणात या हुकूमशहाने अण्वस्त्रांऐवजी प्रथमचअन्नधान्याबद्दल बोलले आहे. सुमारे १० वर्षांपासून उत्तर कोरियावर राज्य करणारा किम जोंग उन त्याच्या हुकूमशाही आणि हिंसक वर्तनासाठी ओळखला जातो, मात्र नवीन वर्षात किम जोंग उन यांनी स्वत:ला बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
शालेय गणवेश, धान्याची चर्चा
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांनी आपल्या भाषणा दरम्यान घातक शस्त्रे आणि अमेरिकेबद्दल बोलण्याऐवजी ट्रॅक्टर कारखाने, शालेय गणवेश आणि अन्नधान्य यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. गेल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्या भाषणात हुकूमशहा म्हणाला, उत्तर कोरियाचे २०२२ वर्षाचे मुख्य लक्ष्य आर्थिक विकास आणि लोकांचे जीवन सुधारणे हे असेल.
कारकिर्दीचा लेखाजोखा
वर्क्स पार्टी ऑफ कोरियाच्या ८ व्या केंद्रीय समितीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी किम जोंग उन यांनी ही माहिती दिली. गेल्या सोमवारपासून ही बैठक सुरू होती. सन २०११ मध्ये वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन उत्तर कोरियाच्या गादीवर बसला. त्यानंतर आता झालेल्या बैठकीत किम जोंग उन याच्या १० वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखाही दहा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या बैठकीत ठेवण्यात आला.
परराष्ट्र संबंध
किम जोंग उन यांनीही आपल्या भाषणात पूर्वीच्या काही गोष्टींचा पुनरुच्चार केला, ज्यात महत्त्वाच्या धोरणाबाबत बोलले गेले. याशिवाय दक्षिण कोरिया आणि अमेरिकेसोबत राजनैतिक संबंध वाढवण्याची चर्चा आहे. तसेच या वेळी कोरियाच्या अंतर्गत आणि परराष्ट्र संबंधांवरच चर्चा करण्यात आली आहे.
देशातील समस्य
या भाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करण्यात आला आहे. किम जोंग उन म्हणाला की, महामारीच्या काळात सीमा बंदी व लॉकडाऊनमुळे देश खूपच वेगळा झाला होता. पुढील वर्षभरासाठी जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, असे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना अन्नाची हमी मिळू शकते. याशिवाय किम जोंग उन यांनी देशातील महत्त्वपूर्ण बदल आणि विकासाचाही उल्लेख केला आहे.
लष्करी ट्रॅक्टरची फॅक्टरी
किम जोंग उन यांचे बहुतेक भाषण देशांतर्गत विषयांवर केंद्रित होते. त्यात गावांचा विकास, जनतेला अन्नधान्य, शालेय गणवेश आणि समाजात पसरलेल्या वाईट गोष्टींचा नायनाट करण्याचा उल्लेख करण्यात आला. किम जोंग उन म्हणाले की, देशाच्या लष्कराने गेल्या वर्षभरात नवीन उंची गाठली आहे. तसेच लष्करी ट्रॅक्टर फॅक्टरीबद्दल त्यांनी सांगितले की, हे ट्रॅक्टर मिसाईल वाहतूकीसाठी वापरले जाणार आहेत.