इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग याला ओळखत नाही, असा जगात एकही माणूस नाही. त्याचं नाव घेतलं तरी आसपासच्या देशांमध्ये दहशत निर्माण होते, एवढा तो आक्रमक आणि हिटलर वृत्तीचा आहे. संपूर्ण जगावर ताबा मिळविण्याचा इरादाही त्याने अनेकदा बोलून दाखवला आहे. किम जोंगच्या कारवाया कधीच थांबत नाहीत, हेही सर्वांना माहिती आहे. आता तर त्याने दक्षिण कोरियात सत्तांतर घडवून आणण्यासाठी आपले ५० हजार एजंट्स पेरून ठेवले आहेत.
दक्षिण कोरिया तसा उत्तर कोरियाच्या तुलनेत शांतताप्रिय देश आहे. पण या देशात आपल्या निकटच्या लोकांची सत्ता स्थापन करून हळूहळू हा देश गिळंकृत करण्याचे किम जोंगचे मनसुबे आहेत. त्यासाठी त्याने ५० हजार सिक्रेट एजंट्स घुसखोर बनवून दक्षिण कोरियात पाठवले आहेत. कोरियन इन्स्टिट्यूट अॉफ लिबरल डेमोक्रसीतील एकाने दिलेल्या माहितीनुसार, सिक्रेट एजंट दक्षिण कोरियात शिरले असले तरीही त्यांनी स्वतःला निर्वासित असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर आपण किम जोंगचे मोठे विरोधक असल्याची भाषाही ते बोलत आहेत. आपल्या मर्जीतील सरकार दक्षिण कोरियात बसविण्यासाठी किम जोंगने हा प्रकार केला असून त्याला डबल क्रॉस कॉन्स्पिरसी असे नाव देण्यात आले आहे. ही मोहीम किम जोंगने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू केली आहे. यात उत्तर कोरियातील काही लोकांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांचा छळ केला जातो आणि मग त्यांना घुसखोर बनवून दक्षिण कोरियात पाठवले जाते.
तुरुंगात करणार उठाव
घुसखोरी करणाऱ्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली असून ते सारे दक्षिण कोरियातील कारागृहात आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोर कारागृहात डांबण्यात आल्यानेच दक्षिण कोरियातील एजन्सीज अलर्ट झाल्या. तुरुंगात राहून दक्षिण कोरियाची व्यवस्था विस्कळित करण्याचं काम ते करणार आहेत. एवढच नाही तर ज्या दिवशी किम जोंग दक्षिण कोरियावर हल्ला करेल, त्याच दिवशी कारागृहातूनच हे लोक उठाव करतील.
हा तर मोहिमेचा भाग
एवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरांचे पकडले जाणे आणि त्यांचे तुरुंगात असणे, हा तर किम जोंगच्या मोहिमेचाच एक भाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. खास उपकरणं आणि व्यवस्थित प्रशिक्षण देऊनच किमने या लोकांना दक्षिण कोरियात पाठवलं आहे.
North Korea Kim Jong Un Conspiracy Politics