नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सर्व शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेल्यामुळे सर्व विद्यापीठीय स्तरावरील परीक्षा तसेच आता येवू घातलेल्या बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालयात तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबरोबर शिक्षकांना इतर कामे ही करावी लागतात. गेल्या काही दिवसांपासून शासनाशी चर्चा सुरू आहे. अद्यापही तोडगा निघालेला नाही . शासन कोणत्याही प्रकारे या कर्मचाऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज एक दिवसीय लाक्षणिक संपात सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. सर्व क्षेत्रातील संघटना या कर्मचाऱ्यांना पाठींबा देत आहेत .
या सगळ्या गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व मानसिकतेवर होत आहे. पालक देखील या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत आहेत . लवकरात लवकर शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देवून हा प्रश्न त्वरीत निकाली काढावा असा सूर सगळीकडून उमटत आहे . शासनाने दोन दिवसात या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर , वीस तारखेपासून हे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटना प्रमुखांनी दिली आहे .विद्यार्थ्याचे भवितव्य लक्षात घेवून शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Non Teaching Staff Agitation Start in Maharashtra