पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल आढळतात, इतकेच नव्हे तर जितक्या व्यक्ती तितके मोबाईलचे विविध प्रकार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातही काही कंपन्या त्यांचे प्रसिद्ध मोबाईल सर्वांनाच आकर्षित करतात. त्यात नोकिया कंपनीचा मोबाईलचा क्रमांक वरचा आहे, असे म्हटले जाते.
HMD ग्लोबल कंपनीने आपला नवीन स्मार्टफोन नोकिया G21 लॉन्च केला आहे. जे मागील वर्षी एप्रिलमध्ये सादर करण्यात आलेल्या नोकिया G20 चे अपग्रेडेड व्हर्जन आहे. फोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंट 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायामध्ये येतो. नोकीया G21 स्मार्टफोन युरोपमध्ये 170 युरो म्हणजेच 14,555 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र, भारतात हा फोन कधी लॉन्च होणार आहे. सध्या याबाबत कोणतीही माहिती नाही. हा फोन नॉर्डिक ब्लू आणि डस्क या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. नोकिया G21 स्मार्टफोन हा एचएमडी ग्लोबलचा पहिला जी सीरीज फोन आहे जो उच्च रिफ्रेश रेट स्क्रीनसह सुसज्ज आहे. यात 6.5-इंचाचा HD + LCD पॅनल आहे. त्याचा स्क्रीन रिफ्रेश दर 90Hz आहे. हा एक उत्तम बजेट Android फोन आहे. नोकिया G21 12nm Unisoc T606 चिपसेटसाठी सपोर्टसह देण्यात येतो.
नोकिया G21 स्मार्टफोनमध्ये 5,050mAh बॅटरी आहे. एका चार्जवर हा फोन तीन दिवस आरामात वापरता येईल, असा कंपनीचा दावा आहे. तसेच हा फोन 18W चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोन बॉक्ससोबत 10W चार्जिंग अॅडॉप्टर दिले जाईल. सदर फोन क्वाड-लेन्स कॅमेरा सिस्टमसह देण्यात येतो. नोकिया G20 मध्ये मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP आहे. तसेच 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर आधारित आहे. तसेच कंपनी म्हणते की, Android 12 अपडेट लवकरच दिला जाईल. फोन 2 ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि तीन वर्षांच्या सुरक्षेसह देण्यात येतात.