अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– इस्त्राईल येथे हेल्थ केअर वर्कर नॉन वॉर क्षेत्रातील आरोग्य विभागामध्ये ५ हजार कुशल मनुष्यबळाची मागणी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना १ लाख ३१ हजार रुपये मासिक वेतन दिले जाणार असून जिल्ह्यातील पात्र व इच्छुक युवक-युवतींनी https://maharashtrainternational.com/jobDetail.aspx या संकेतस्थळावर नोंदणी करुन या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले आहे.
या नोकरीच्या संधीसाठी इंग्रजी भाषेचे तसेच सामान्य ज्ञान असणाऱ्या २४ ते २५ वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. उमेदवाराकडे काळजीवाहू (घरगुती सहायक) सेवांसाठी भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच जीडीए,एएनएम,जीएनएम,बीएससी, नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंग आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
या नोकरीसाठीची निवड प्रक्रिया, नियुक्तीचे वाटप, आरोग्य तपासणी, व्हीसा आणि पासपोर्टसाठीचे मार्गदर्शन व मदत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून केली जाणार आहे. आरोग्य विमा, राहण्याची व जेवणाची सुविधाही पुरविली जाणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी मच्छिंद्र उकिरडे भ्रमणध्वनी क्र. ९५९५७२२४२४, वसिम पठाण- ९४०९५५५४६५ अथवा कार्यालयाच्या ०२४१-२९९५७३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.