हैद्राबाद – एका भारतीय संशोधकाने ध्वनी शोषक पॅनेल म्हणून मधमाशांच्या पोळ्यासारख्या असलेल्या कागदाच्या शीट आणि पॉलिमर रचना तयार केल्या असून ध्वनीप्रवाह उर्जेचे लो फ्रिक्वेन्सीमध्ये रुपांतर करणारी पॅनेल म्हणून त्यांचा वापर करता येईल. या तंत्रज्ञानाचा उपयोग ध्वनीप्रवाह नियंत्रण प्रणाली तयार करण्यासाठी त्याचबरोबर पर्यावरणीय गोंगाट नियंत्रणासाठी होणार आहे. नेहमी वापरली जाणारी सामग्री हाय फ्रिक्वेन्सी नियंत्रणासाठी उपयुक्त ठरत असे. मात्र, मधमाशांचे नैसर्गिक पोळे त्यांच्या भूमितीय रचनेमुळे हाय फ्रिक्वेन्सी बरोबरच लो फ्रिक्वेन्सी नियंत्रणासाठी देखील प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले. या संदर्भातील सैद्धांतिक विश्लेषण आणि प्रयोगाद्वारे केलेल्या तपासणीतून असे दिसून आले की अशा प्रकारच्या रचना ध्वनीप्रवाह उर्जेचे कंपन उर्जेत रुपांतर करतात. या रचनांमध्ये असलेल्या भितींमध्ये ओलावा टिकवण्याच्या गुणधर्मामुळे या कंपन उर्जेतून उष्णता निर्माण होऊ लागत असल्याचेही दिसून आले. हा गुणधर्म कृत्रिम पद्धतीने विकसित केल्यास ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी एक अतिशय किफायतशीर अभियांत्रिकी उपाययोजना उपलब्ध होऊ शकते.
हैदराबाद आयआयटीच्या मेकॅनिकल ऍन्ड एरोस्पेस इंजिनियरिंग विभागात अध्यापक असलेले डॉ. बी वेंकटेशम आणि डॉ. सूर्या यांनी बायोमिमेटिक डिझाईन तंत्रज्ञानाचा वापर करून या गुणधर्मावर आधारित कमी जाडीची परंतु अतिशय मजबूत असलेली अकौस्टिक पॅनेल्स तयार केली आहेत. मधमाशांच्या पोळ्यांमध्ये ध्वनीप्रवाह उर्जा नियंत्रित करण्यासाठी कारणीभूत असलेले भौतिक विज्ञान समजून घेणे आणि त्या रचनेची नक्कल तयार करणे याचा या तंत्रज्ञानात समावेश आहे. या संशोधकांच्या टीमने एक गणितीय मॉडेल तयार केले आणि योग्य त्या मापदंडांची गणना केली आणि त्यानंतर त्या आधारे ही रचना तयार केली. सुरुवातीला काही नमुने तयार केल्यावर तशाच प्रकारचे जास्त नमुने बनवण्यात आले. प्रारंभिक रचना (प्रोटोटाईप) तयार करताना त्यांनी दोन वेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा वापर केला. एका रचनेत विस्तारापूर्वीचे मधमाशीचे पोळे जसे तयार होते त्या प्रक्रियेद्वारे कागदी पोळे बनवण्यात आले तर दुसरी रचना हॉट वायर तंत्रज्ञानावर आधारित पॉलिमर पोळ्याची होती. पॉलिप्रोपिलिन स्ट्रॉचे ढीग तुकड्यांमध्ये कापून ही पॅनेल तयार करण्यात आली. हॉट वायरने हे तुकडे कापले जात असल्याने ते स्ट्रॉ एकमेकांना चिकटवतही होते. हे तंत्रज्ञान ध्वनीप्रवाह उर्जेचे उत्सर्जन करणारी कमी जाडीची आणि जास्त मजबुती असलेली पॅनेल तयार करण्यासाठी उपयुक्त आहे.
For more details, Dr B. Venkatesham (9912986892, venkatesham@mae.iith.ac.in) can be contacted.
Tubular Polypropylene | Paper honeycomb | |
Natural honeybee hive | Engineered acoustic panels |
Tubular Polypropylene | Paper honeycomb |
Prototype Machines for large sample fabrication |