मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर आज टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली. टाटा समूहाच्या अनेक कंपन्यांची होल्डिंग कंपनी, टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा ६६ टक्के हिस्सा आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहे.
शुक्रवारी टाटा ट्रस्टच्या संचालक मंडळाची बैठकीत हा निर्णय़ घेण्यात आले. त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. रतन टाटा हे १९९१ पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांनंतर टाटा समूहाला आंतराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आणले होते. त्यांच्या निधनानंतर आता नोएल टाटा यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आली आहे.
१९४० मध्ये नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केले. या दोघांच्या मुलाचं नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सर दोराबाई टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. ते गेल्या ४० वर्षापासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॅार्पोरेशनचे ते चेअरमन आहेत. टाटा स्टील आणि टायटन कंपनीचे व्हाईस चेअरमन आहेत. नोएल टाटांच्या नेतृत्वात टरेंटचा व्यवसाय मोठया प्रमाणात वाढला.