नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय शांतता नोबेल विजेती युसुफझाई मलाला हिने तिच्या आयुष्यातील नव्या पर्वाला प्रारंभ केला आहे. तिने लग्नगाठ बांधली आहे. मलाला हिचा विवाह असर मलिक यांच्यासोबत निश्चित झाला आहे. तशी माहिती मलाला हिनेच दिली आहे. बर्मिंघहम येथे हा छोटेखानी समारंभ संपन्न झाला. मी माझ्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरूवात करीत आहे. आपल्या सर्वांचे शुभाशिर्वाद आवश्यक आहेत, असे मलालाने म्हटले आहे. नवदाम्पत्य एका शाही कपड्यांमध्ये दिसून येत आहे. २०१४ मध्ये मलाला हिला शांतता नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यावेळी ती अवघ्या १७ वर्षांची होती. पाकिस्तानमध्ये मुला-मुलींना शिक्षण मिळायला हवे, यासाठी मलालाने आवाज उठविला. त्याचा राग आल्याने दहशतवाद्यांनी मलालावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यात ती सुदैवाने बचावली होती. जगभरात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उदात्त कार्याबद्दल तिला नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.