इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकार लवकरच नवीन कायदा आणणार आहे. विशेष म्हणजे या कायद्यामुळे तुम्हाला ५०० रुपयांचा फायदाही मिळणार आहे. यानुसार एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी गाडी पार्किंग केली असेल तर त्याचा फोटो आपल्या मोबाईलवर क्लिक करून पाठवायचा आहे. फोटो पाठवणाऱ्याला ५०० रुपये बक्षिस स्वरुपात दिले जातील. त्यामुळे आपण रस्त्याच्या कडेला चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क करत असू तर यापुढे आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय, पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन उपाययोजना राबवण्याच्या तयारीत आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली की, केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे, ज्या अंतर्गत चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवणाऱ्याला ५०० रुपये दिले जातील. फोटो काढण्यासाठी लोकं कोणत्याही ठिकाणी भेट देऊ शकतात. रस्त्यावर अनेकजण त्यांची वाहने उभी करतात आणि इतरांसाठी अडचणी तयार करतात. राजधानी दिल्लीत तर ही समस्या खूप जास्त आहे.
गडकरी म्हणाले की, केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे, जो रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी आपली गाडी पार्क करेल, त्याच्या गाडीचा फोटो काढून पाठवण्याविषयी तरतूद यात आहे. फोटो काढणाऱ्याला ५०० रुपये दिले जातील. समजा गाडीसाठी १००० रुपये दंड असेल तर ५०० रुपये पाठवणाऱ्याला दिले जातील. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. ते म्हणाले की लोक घरे मोठी करतात पण घरासमोर पार्किंग बांधत नाहीत. अशांसाठी हा चांगला धडा असेल.
स्वतःच्या घराचे उदाहरणही यावेळी गडकरींनी दिले. त्यांच्या नागपुरातील घरी पोळ्या बनवण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीकडे दोन सेकंड हँड कार आहेत. पूर्वी अमेरिकेत असे घडत असे, साफसफाई करणारी महिलेकडेही कार असायची. तेव्हा ते सगळं पाहणं आश्चर्यकारक असायचं. पण आता आपल्या देशातही हे घडत आहे. त्यांच्या घराचा उल्लेख करताना ते म्हणाले की, आम्ही आमच्या नागपुरातील घरात १२ वाहनांसाठी पार्किंग केले आहे. मी माझी गाडी रस्त्यावर पार्क करत नाही. भारतात एका कुटुंबात चार लोकं आणि सहा वाहने आहेत. दिल्लीचे उदाहरण देताना ते म्हणाले की, दिल्लीचे लोक भाग्यवान आहेत कारण आम्ही त्यांच्या गाडीच्या पार्किंगसाठी रस्ता बनवला आहे. कोणीही पार्किंग तयार करत नाही प्रत्येकजण रस्त्यावर आपली कार पार्क करतो. अशा सर्वांना धडा शिकवण्यासाठी हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावेल.
no carking par photo sent got prize Road and Transport Minister Nitin Gadkari