नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– नाशिक महानगरपालिकेच्या २०२५ मध्ये होणा-या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिध्द करण्यात आल्या आहे. या प्रारुप रचनेवर हरकती व सुचना मागविण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. हरकती व सुचना यांचा कालावधी शुक्रवार २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ हा असणार आहे.
नाशिक मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकुण ३१ प्रभाग असणार असून त्यात १२२ नगरसेवक निवडून जाणार आहे. या ३२ प्रभागात चार सदस्यीय प्रभागाची संख्या २९ तर तीन सदस्यीय प्रभागाची संख्या २ असणार आहे. या अगोदरही ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली होती. ती आताही जैसे थेच आहे. यात कोणताही बदल करण्यात आला नाही.
https://nmc.gov.in/home/getfrontpage/235/204/M

