सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात अनधिककृत होर्डिंग्जविरोधात थेट गुन्हे…महापालिका आयुक्तांनी दिले आदेश

by India Darpan
मे 29, 2025 | 3:52 pm
in स्थानिक बातम्या
0
NMC Nashik 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अनधिकृत होर्डिंगमुळे नाशिक शहराचे होणारे विद्रुपीकरण हा कायम टीकेचा विषय होत असतो. यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने शहरातील अनधिकृत होर्डिंग्जविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेने सहाही विभागीय कार्यालयांतील कार्यक्षेत्रामध्ये महापालिका मालकीच्या १८१ खुल्या जागेत तात्पुरत्या स्वरुपात जाहिरात, शुभेच्छा फलक उभारण्यास परवानगी दिली आहे. या फलकांवर जाहिरात परवाने विभागाचा क्यूआर कोड प्रसिद्ध करणे बंधनकारक असणार आहे. वरील ठिकाणांवर लावलेल्या होर्डिंगवरही क्यूआर कोड नसेल तर अशा अनधिकृत होर्डिंग्ज लावणा-यांकडून आर्थिक दंड वसूल करून थेट गुन्हे दाखल करा, असे आदेश महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

नाशिक शहरात राजकीय पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्था व इतर अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट पाहायला मिळतो. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश असूनही महापालिका प्रशासन कारवाई करण्यास धजावत नाही. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, नेते यांचे फलक कोणत्याही परवानगीशिवाय सर्रास लावले जातात. मात्र, आता आयुक्तांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानुसार महापालिकेच्या जाहिरात परवाने विभागाने होर्डिंग लावण्यासाठी १८१ जागा निश्चित केल्या आहेत.

या ठिकाणांची यादी मनपाचे संकेतस्थळ व सर्व विभागीय कार्यालयांच्या नोटीस फलकावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. होर्डिंग लावू इच्छिणा-या व्यक्तींनी विभागीय कार्यालयांच्या नागरी सुविधा केंद्रात विहित मुदतीत रितसर अर्ज दाखल करावा व संबंधित विभागाने परवानगी दिलेले ठिकाण व परवानगीचा कालावधी याची माहिती असणारा क्यूआर कोड दर्शनी भागावर प्रदर्शित करण्यात यावा तरच ते अधिकृत मानण्यात येईल, असा नियम केला आहे.

महापालिकेने यापूर्वीही अनेकदा अनधिकृत होर्डिंगविरोधात वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. मात्र, त्याच्या केवळ घोषणा झाल्या. अमलबजावणी झाली नाही. यामुळे या घोषणेची अमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक….नायब तहसिलदार असल्याचे भासवून महिलेस लग्न करण्याचे आमिष दाखवून लाखोंला गंडा….

Next Post

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

Next Post
accident 11

भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011