नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुक प्रारुप प्रभाग रचनेवर विहित मुदतीत नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणी ९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. स्थायी समिती सभागृह, दुसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे सुनावणी पार पडली.
नगरविकास विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने प्राधिकृत अधिकारी संजय खंदारे, भा.प्र.से., प्रधान सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई तसेच मनिषा खत्री आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका यांनी स्वतः हरकती व सुचना ऐकून घेतल्या.
नियोजित मुदतीत ६ विभागीय कार्यालये तसेच मनपा मुख्यालय येथे प्राप्त झालेल्या एकूण ९१ हरकती/सुचना यावर सदर सुनावणी घेण्यात आली.ज्या नागरिकांनी विहित मुदतीत लेखी हरकती/सूचना नोंदविलेल्या होत्या त्यांना नेमून दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहून आपल्या हरकती व सूचना विस्तृतपणे मांडल्या यावर सखोल अभ्यास करून लवकरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे संजय खंदारे यांनी सांगितलें आहे.
सुनावणी करिता लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त ,संजय अग्रवाल शहर अभियंता ,दिपक वराडे उपसंचालक नगर नियोजन,सचिन जाधव कार्यकारी अभियंता,नगर नियोजन,नितीन पाटील, रवींद्र बागुल,रवी पाटील, नवनीत भामरे कार्यकारी अभियंता तसेच निलेश साळी,समीर रकटे, दत्तात्रय कोल्हे उपअभियंता उपस्थित होते.