मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बूस्टर डोस, मिश्र लसींचे प्रयोग याबाबत एनआयव्हीचे संचालीका प्रिया अब्राहम यांनी केले हे विश्लेषण

ऑगस्ट 18, 2021 | 2:17 pm
in राष्ट्रीय
0
niv

पुणे- आपल्यासाठी २०२१ हे अतिशय खडतर तरीही फलदायी वर्ष होते” असे आयसीएमआर एनआयव्हीच्या संचालीका श्रीमती प्रिया अब्राहम यांनी म्हटले आहे. पुण्यातील आयसीएमआर – राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था ( एनआयव्ही) गेले वर्षभर य संदर्भात युद्धपातळीवर काम करत आहे. सार्स-सीओव्ही-2 च्या देशातील वैज्ञानिक संशोधनात ही संस्था अग्रेसर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या इंडीया सायन्स (भारत विज्ञान) या ओटीटी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली.

सार्स-सीओव्ही-2 च्या देशातील वैज्ञानिक संशोधनात आघाडीवर असलेल्या या संस्थेत कशाप्रकारे लस विकसित केली, त्या प्रक्रियेची त्यांनी झटपट, नेमकी माहिती दिली. “आम्ही लगेच कोरोना विषाणूचे विलगीकरण करत तत्कालिक (प्रकार) स्ट्रेन भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडला (बीबीआयएल) एप्रिल (2020) अखेपर्यंत दिला. त्यांनी निष्क्रीय विषाणूपासून मे महिन्यात लस विकसित केली आणि पुनरावलोकनासाठी आमच्याकडे पाठवली.” आम्ही, लसीच्या निष्क्रीय वैशिष्टयाबाबतची संपूर्ण तपासणी केली. तिचे वर्गिकरण केले. हॅम्टस्टर आणि माकडांवर त्यांच्या क्लिनिकलपूर्व चाचण्या सुरु केल्या. ते खूपच अवघड प्रयोग आहेत. अत्युच्च जैवसुरक्षा पातळी चार दर्जाच्या नियंत्रण सुविधेसह या चाचण्या घेण्यात आल्या. पुढच्या टप्प्यात, आम्ही त्यांना निदान आणि प्रयोगशाळा सहाय्य या क्षेत्रात टप्पा I, II आणि III मधे क्लिनिकल चाचणीसाठी मदत केली. कोविड-19 संबंधित वैज्ञानिक घडामोडींबाबतच्या मुलाखतीतील भाग, महामारीच्या भविष्याबाबतचे विश्लेषण आणि विषाणू बाबतच्या सर्वसामान्य प्रश्नांचा उहापोह इथे केला आहे.

प्रश्न – बालकांवरची कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी कोणत्या टप्प्यावर आहे ? बालकांसाठी ती कधीपर्यंत उपलब्ध होईल?
– बालकांसाठी वयोगट 2-18 करता सध्या कोव्हॅक्सिनची चाचणी II आणि III टप्प्यात आहे. आशा आहे की लवकरच याबाबतचे निष्कर्ष हाती येतील.त्यानंतर ते नियंत्रकांना सादर केले जातील. त्यामुळे सप्टेंबर किंवा त्यानंतर लगेच बालकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक लस उपलब्ध होऊ शकते. याशिवाय झायडस कॅडिलाच्या लसीचीही चाचणी सुरु आहे. ती देखील बालकांसाठी वापरली जाऊ शकते आणि उपलब्ध होऊ शकते.

प्रश्न – याव्यतिरिक्त आपल्या नागरिकांसाठी आणखी कोणत्या लसी उपलब्ध होऊ शकतात?
– पहिल्या डीएनए लसीच्या रुपात झायडस कॅडिलाची लस वापरासाठी उपलब्ध होईल. याशिवाय, गेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडची एम-आरएनए लस, बायोलॉजिकल-ई लस, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची नोवोवॅक्स आणि आणखी -भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने विकसित केलेली इंट्रा-नेझल ही वैशिष्टपूर्ण लस. यासाठी सुई टोचण्याची गरज नाही. ती नाकपुड्यांद्वारे दिली जाऊ शकते.

प्रश्न – डेल्टा प्लस प्रकारावर सध्या उपलब्ध असलेल्यापैकी कोणत्या लसी प्रभावी ठरु शकतील?
– आधी एक लक्षात घ्या, डेल्टा-प्लस प्रकार डेल्टा प्रकारापेक्षा पसरण्याची शक्यता कमी आहे. डेल्टा प्रकार प्रामुख्याने 130 पेक्षा जास्त देशांमध्ये सध्या आहे. जगभर त्याचा फैलाव झाला असून या प्रकाराचा फैलाव वेगाने होतो. राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था इथे आम्ही या प्रकारावर अभ्यास केला आहे. आम्ही लसीकरण केलेल्या लोकांच्या शरीरात तयार होणाऱ्या प्रतिपिंडांचा (अँटीबॉडीजचा) अभ्यास केला आणि या प्रकाराविरुद्ध ते काय करतात हे तपासले. या प्रकाराविरूद्ध प्रतिपिंडांची परिणामकारकता दोन ते तीन पटीने कमी झाल्याचे आढळले. तरीही, या प्रकाराविरुद्ध लस अजूनही सुरक्षा प्रदान करते. त्यांची परिणामकारकता थोडी कमी वाटू शकते पण रुग्णालयात दाखल होण्याची किंवा दगावण्याची शक्यता असणाऱ्या गंभीर स्वरुपाच्या रोगाला, प्रतिबंध करण्यासाठी लसी खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे विषाणूचा प्रकार कोणताही असो आतापर्यंत लसी परिणामकारक आहेत. तेव्हा संकोच किंवा संभ्रम बाळगू नका.

प्रश्न – येणाऱ्या काळात आपल्याला बूस्टर मात्रेची गरज आहे का? या संदर्भात काही अभ्यास झाला आहे का?
– जगभरात बूस्टर मात्रेवर अभ्यास केला जात आहे. वेगवेगळ्या किमान सात लसी बूस्टर मात्रा म्हणून वापरल्या गेल्या आहेत. आणखी देशांचे लसीकरण होईपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेने सध्या हे थांबवले आहे. श्रीमंत आणि गरीब देशातली लस उपलब्धतेची दरी बघता हे पाऊल उचलले आहे. पण, भविष्यात बूस्टर मात्रेची शिफारस नक्कीच येणार आहे.

प्रश्न – मिश्र लसीच्या अर्थात त्या आलटून पालटून घेण्याबाबत काही अभ्यास होतोय का? ते आपल्यासाठी लाभदायक असेल का?
– अनवधानाने दोन वेगवेगळ्या लसीच्या मात्रा लसवंताला दोन टप्प्यात दिल्या गेल्या, असेही घडले आहे. आम्ही एनआयव्हीमधे ते नमूने तपासले. ती व्यक्ती सुरक्षित असल्याचे आढळले. कोणताही प्रतिकूल परिणाम आढळला नाही. रोगप्रतिकारशक्ती थोडी चांगलीच होती. त्यामुळे सुरक्षेला घातक असे यात नक्कीच काही नाही. यावर आमचा अभ्यास सुरु असून थोड्याच दिवसात अधिक तपशील देऊ शकू.

प्रश्न – अधिक परिणामकारक आणि विश्वासार्ह अशी कोविड-19 चाचणीची कोणती नवी पद्धत उदयाला आली आहे का?
– दुसऱ्या लाटेवेळी रुग्णालये आणि प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने रुग्णांची रांग लागली. त्यांचे अनेक कर्मचारी संक्रमित झाले. त्यामुळे चाचण्यांची क्षमता त्यावेळी उणावली होती. आवश्यक रासायनिक द्रव्याचाही तुटवडा होता. या सगळ्याचा चाचण्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. आरपीसीआर चाचणी 70% परिणामकारक आहे. तरीही जागतिक आरोग्य संघटनेने तीला मान्यता दिली आहे. पण भविष्यात, अधिक सोपी आणि त्वरीत, प्रयोगशाळेत नमूने पाठवण्याची गरज नसलेली, जागेवरच होऊ शकणारी चाचणी आपल्याला दिसेल.

प्रश्न – कृपया आयसीएमआर द्वारे विकसित आरटी-एलएएमपी चाचणीबद्दल माहिती द्या.
– आयसीएमआरने आरटी-एलएएमपीचे उत्पादन केले आहे. ते किफायतशीर आहे. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. अगदी जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रातही त्याचा वापर कराता येऊ शकतो. तांत्रिकदृष्टया फारशा प्रगत नसलेल्या ठिकाणीही तातडीने आणि जलदरित्या करता येणाऱ्या या चाचण्या भविष्यात अधिक लोकप्रिय ठरतील.

प्रश्न – स्वतःच चाचणी करु शकतो असे किटही आता बाजारात आले आहेत, यामुळे चाचण्यांचा वेग वाढेल का?
– सेल्फ टेस्ट किट हे अँटीजेन किट आहेत. त्यामुळे त्यांची परिणामकारकता आरटीपीसीआर पद्धतीपेक्षा कमी आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांमधे ती चांगली असू शकते पण लक्षणे नसलेल्या रुग्णामध्ये कमी आहे.

बर्ड फ्लू किंवा झिका विषाणूने संक्रमित व्यक्ती सार्स-सीओव्ही-2 संसर्गाली बळी पडू शकते का?
– होय, डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिका विषाणूसारखे विषाणूजन्य संक्रमण डासांच्या चाव्याव्दारे पसरतात, पावसाळ्यात ते वाढणार आहेत. परिसरात पाणी साचू देऊ नका, कारण त्यात डासांची पैदास होते. डासांच्या चाव्याव्दारे पसरणाऱ्या या संसर्गाच्या सोबत कोरोनाचा संसर्ग होणे अधिक भयंकर असेल.

प्रश्न – माध्यमांमधे गर्दीची अनेक छायाचित्रे दिसतात. अशा बेजबाबदार वर्तनामुळे किती नुकसान होऊ शकते?
– नक्कीच यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. नव्या लाटेला हे निमंत्रणच आहे. “आपण महामारी संपवण्याची निवड करु तेव्हा ती संपेल. हे आपल्या हातात आहे.” असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस ए घेब्रायसस यांनी म्हटले आहे. याचा अर्ध आपण सावधगिरी बाळगायला हवी. विशेषत: येणाऱ्या सणासुदीच्या काळात, गर्दीत मिसळू नये यामुळे विषाणू वेगाने पसरु शकतो.

प्रश्न – यापुढे आणखी लाट येणार नाही हे शक्य आहे का?
– विषाणूचे नवे प्रकार येतच आहेत. आपल्याकडे सुरक्षेसाठी दोन मोठी शस्त्रे आहेत. ती म्हणजे: मास्कचा अचूक वापर आणि प्रत्येकाला लसीकरणासाठी प्रोत्साहीत करणे. मग भले लाट आली तरी ती मोठी नसेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील या जिल्ह्यातील व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना होणार लाभ

Next Post

नाशिक- मेडीकल कॉलजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
प्रातिनिधिक फोटो

नाशिक- मेडीकल कॉलजमध्ये शिकाऊ डॉक्टरचा संशयास्पद मृत्यु....

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011