नवी दिल्ली – आतापर्यंत, प्लॅस्टिक कचऱ्याचा वापर करुन, देशात ७०३ किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत. या रस्त्यांवर फ्लेक्सीबल पेव्हमेंट च्या वर प्लॅस्टिकचे आवरण दिले आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने या संबंधी अधिसूचना जारी करत, राष्ट्रीय महामार्गावर, पांच लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नागरी भागाच्या ५० किमी परिसरात, या महामार्गालगतच्या सर्विस रोड (सेवा रस्ता) च्या नूतनीकरणाच्या कामात, हॉट मिक्स मध्ये प्लॅस्टिक कचऱ्याचा वापर करणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय पर्यावरणपूरक असून, प्लॅस्टिकच्या पुनर्वापरामुळे त्याचे पर्यावरनावरील घटक परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत एका लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली