नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कारमध्ये ६ एअरबॅगची सक्ती नक्की कधीपासून होणार आहे याचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोठा खुलासा केला आहे. ६ एअरबॅगचा नियम येत्या १ ऑक्टोबरपासून म्हणजेच परवापासून लागू होणार होता, परंतु आता तो एक वर्ष पुढे ढकलण्यात आला आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०२३ पासून भारतामध्ये प्रत्येक कारला ६ एअरबॅग सक्तीच्या असतील. जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अनेक वाहन कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.
गडकरी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “मोटार वाहनातून प्रवास करणार्या सर्व प्रवाशांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सुरक्षेची किंमत आणि प्रकार काहीही असो.” “ऑटो उद्योगात जागतिक पुरवठा-साखळीमध्ये व्यत्यय आला आहे. त्याचा परिणाम लक्षात घेता, प्रवासी कार (M-1 श्रेणी) मध्ये किमान ६ एअरबॅग असणे आवश्यक आहे. सध्याच्या अडीअडचणी लक्षात घेता १ ऑक्टोबर २०२३ पासून एअरबॅग लागू करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मारुतीलाही ६ एअरबॅगची समस्या
मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी सांगितले होते की ६ एअरबॅग्ज बसवल्याने कारची किंमत ६० हजार रुपयांनी वाढेल, जी कोणत्याही एंट्री लेव्हल कारसाठी खूप मोठी मार्जिन आहे. यामुळे, कंपनी काही मॉडेल्सचे काही प्रकार बंद करू शकते. चार एअरबॅग्ज दिलेल्या मॉडेलमध्ये अनेक संरचनात्मक बदल करावे लागतील. साइड एअरबॅग्ज पुढील सीटच्या मागील बाजूस बी-पिलरच्या वर पडदा एअरबॅग्ज असतील. ज्या कार सध्या फक्त २ एअरबॅगसह येतात त्यांना अशा संरचनात्मक बदलांना सामोरे जावे लागेल. त्यासाठी अतिरिक्त गुंतवणूकही करावी लागणार आहे. तर प्रीमियम कार म्हणजे ज्या कारची किंमत ५ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांची किंमत आता वाढणार आहे. सध्या एंट्री लेव्हल कारमध्ये फक्त २ एअरबॅग जोडण्यासाठी ३० हजार रुपये मोजावे लागतात.
गडकरींनीच सांगितली एअरबॅगची खरी किंमत
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या वेळी कारमधील एअरबॅगचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विचारले होते की, ६ एअरबॅगची अधिसूचना कधी येणार आहे, जेणेकरून कंपन्यांसाठी ६ एअरबॅग्जचे धोरण लागू करता येईल. या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले की, एअरबॅगची किंमत फक्त ८०० रुपये आहे. सरकार ६ एअरबॅगच्या प्रस्तावावर विचार करत आहे. त्याची अंमलबजावणीही लवकरच होणार आहे. देशात दरवर्षी ५ लाखांपर्यंत रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये दीड लाख जणांना जीव गमवावा लागतो. सध्या, कारमधील ड्रायव्हर आणि पुढच्या सीटच्या प्रवाशाला एअरबॅग आवश्यक आहेत. मागे बसलेल्या व्यक्तींसाठी एअरबॅगचा नियम नाही. मात्र, सरकारने सर्व प्रवाशांसाठी एअरबॅग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मग कारची किंमत का वाढणार?
एअरबॅगची किंमत ८०० रुपये असताना कंपनी त्यावर १५ हजार रुपये का आकारत आहे, असे प्रश्न निर्माण होतो. आरसी भार्गव यांच्या मते, जर ६ एअरबॅग्ज बसवल्या गेल्या तर त्यांची किंमत ६० हजार रुपयांनी वाढेल. कारमध्ये आधीच २ एअरबॅग आहेत, म्हणजेच ४ एअरबॅग बसवण्याचा खर्च १५ हजार प्रति एअरबॅग या दराने ६० हजार असेल. गडकरींच्या मते, एअरबॅगची किंमत ८०० रुपये आहे. म्हणजेच ४ एअरबॅगची किंमत ३२०० रुपये आहे. एअरबॅगसह काही सेन्सर्स, सपोर्टिंग ऍक्सेसरीज देखील बसविल्याचे गृहित धरले तर एअरबॅगची किंमत सुमारे ४०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते. म्हणजेच एअरबॅगची किंमत १३०० रुपये असू शकते. म्हणजेच ४ एअरबॅगची किंमत ५२०० रुपयेच होते. मग कंपनी ६० हजार रुपये का सांगत आहेत, हे अनुत्तरीतच आहे.
Considering the global supply chain constraints being faced by the auto industry and its impact on the macroeconomic scenario, it has been decided to implement the proposal mandating a minimum of 6 Airbags in Passenger Cars (M-1 Category) w.e.f 01st October 2023.
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) September 29, 2022
Nitin Gadkari 6 Airbags Compulsory deadline